डुबेरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गांधी संस्कार परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 05:42 PM2019-03-31T17:42:42+5:302019-03-31T17:42:57+5:30
सिन्नर: तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने गांधी विचार संस्कार परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
सिन्नर: तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने गांधी विचार संस्कार परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या आदित्य मोहन माळी याने जिल्हयात तृतीय क्रमांक पटकावला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक यांच्या सहकार्याने गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने गांधी विचार संस्कार परीक्षेचे जिल्ह्यात आयोजन करण्यात आले होते. त्याला ब्रांझ पदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. वर्गशिक्षक श्रीमती एस. एस. पगार, परीक्षा केंद्र समन्वयक एन. पी. माळी यांचे मार्गदर्शन लाभले. माळी याचे कौतुक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक हेमंत नाना वाजे,शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव वामने, विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. येवले यांनी केले आहे. प्राचार्य येवले,पर्यवेक्षक पी. टी. जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.