सीए परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:43 AM2019-08-14T01:43:44+5:302019-08-14T01:44:06+5:30

इन्स्टिट्यूट आॅफ चार्टड अकाउंट्स आॅफ इंडिया म्हणजेच ‘सीए’ च्या फायनल परीक्षेता निकाल मंगळवारी (दि.१३) जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

Success of Nashik students in CA exam | सीए परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश

सीए परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश

Next

नाशिक : इन्स्टिट्यूट आॅफ चार्टड अकाउंट्स आॅफ इंडिया म्हणजेच ‘सीए’ च्या फायनल परीक्षेता निकाल मंगळवारी (दि.१३) जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
सीए फायनलच्या जुन्या आणि नवीन कोर्ससाठी ग्रुप-१ची परीक्षा २७, २९, ३१ मे आणि ४ जून रोजी घेण्यात आली होती, तर ग्रुप २ ची परीक्षा ७, ९, ११ आणि १३ जून रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल झाली झाला असून, नाशिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे. यात मुकेश खोंड, प्रदीप जोशी, यांनी दोन्ही ग्रुप उत्तीर्ण केले असून, वैष्णवी शिंदे व चिन्मय खरोटे ग्रुप-२ उत्तीर्ण करून लक्षवेधी यश संपादन केले. त्यासोबतच प्रतीक गरुड, सतीश मराठे, रश्मी बोथरा या विद्यार्थ्यांनी सीए उत्तीर्ण केले असून, स्नेहा देशमुख, सौरभ गायकवाड यांनी सीए फाउंडेशन कोर्सच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. सी.ए. अंतिम परीक्षेत सुशांत वसंत राऊत याने देखील यश मिळविले. विद्यार्थ्यांना आयसीएआयच्या संकेतस्थळासोबतच ई-मेल व एसएमएसच्या माध्यमातूनही निकाल पाहण्याची सुविधा आहे. यासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होणार आहे. या निकालासोबतच संपूर्ण देशभरातून सर्वोत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या ५० विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि पिनकोडचा वापर करावा सागणार आहे.
विद्यार्थ्यांना गुणपत्रिका पोस्टामार्फत पाठविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशभरातून उत्तीर्ण विद्यार्थी
सीए परीक्षेत देशभरातून नवीन अभ्यासक्रमातील केवळ गु्रप एकसाठी प्रविष्ट ८ हजार ८९४ पैकी १५०० विद्यार्र्थी उत्तीर्ण झाले असून, केवळ ग्रुप दोनसाठी प्रविष्ट सहा हजार ५२९ पैकी ११४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर दोन्ही ग्रुपसाठी प्रविष्ट झालेल्या ११ हजार ९२ विद्यार्थ्यांपाकी १६६९ विद्यार्थी ग्रुप एक, तर ४३२ विद्यार्थी ग्रुप दोन उत्तीर्ण झाले, तर दोन हजार ३१३ विद्यार्थी दोन्ही ग्रुप उत्तीर्ण झाले आहेत. नव्या अभ्यासक्रमानुसार देशभरात तीन हजार ३६९ विद्यार्थ्यांनी सनदी लेखापाल म्हणून पात्रता पाप्त केली आहे.
४तर जुन्या अभ्यासक्रमातील केवळ ग्रुप एकला प्रविष्ट २५ हजार ५२ विद्यार्थ्यांपक ी चार हजार ६१०, गु्रप दोनला प्रविष्ट ३६ हजार ९४५ हजार विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ७६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर दोन्ही ग्रुपसाठी प्रविष्ट १५ हजार ५६० विद्यार्थ्यांपैकी २१२७ विद्यार्थी ग्रुप एक, ६०२ विद्यार्थी ग्रुप दोन व ११८७ विद्यार्थी दोन्ही ग्रुप उत्तीर्ण झाले आहेत. जुन्या अभ्यासक्रमानुसार यावर्षी दहा हजार ८१६ विद्यार्थ्यांनी सनदी लेखापाल म्हणून पात्रता प्राप्त केली आहे.

Web Title: Success of Nashik students in CA exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.