वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती, समस्त देशवंडी, ग्रामस्थ ता. सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने देशवंडी गावातील शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या निवडक युवक-युवतींसाठी वामनदादा कर्डकांच्या गीतांचा परिचय, अभ्यास व रसग्रहण होण्याच्या दृष्टीने युवापिढीला वामनदादांच्या गीतांची ओळख करून देणारी सामाजिक प्रबोधन गीतांची अभिनव कार्यशाळा यशस्वी झाली.
लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक, महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक, कार्याध्यक्ष यांच्या संकल्पनेतून रविवारी (दि.२९) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सामाजिक सभागृह देशवंडी येथे ही कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन देशवंडी ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ताराम डोमाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यशाळेत गायक रतन गायकवाड, आशा गायकवाड, शुभम यादव (हार्मोनियम), कुलदीप गोराडे (सिंथेसायझर), नीलेश तेलोरे (ढोलक) आदींचा सहभाग होता. त्याकरिता संयोजक सरपंच दत्ताराम डोमाडे, शरद शेजवळ, प्रवीण कर्डक, शरद शेजवळ, देवीदास कर्डक आदींनी परिश्रम घेतले.