दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना येथे महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगावच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत उस वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात आले.महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगावच्या प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक वर्षा के. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस वाहतूक वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. धोकादायकरित्या उस वाहतुक न करणे, वाहन क्षमतेपेक्षा जास्त माल वाहनामधे न भरणे तसेच एका ट्रॅक्टरला एक पेक्षा अधिक ट्रॉली न जोडणेबाबत सुचना देण्यात आल्या.उस वाहतुक करणाºया सर्व वाहनांना पाठीमागील बाजूस स्पष्ट दिसतील अशा पध्दतीने रिफलेक्टर बसविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून सुमारे ५० वाहनाना तवरीत रिफलेक्टर बसविण्यात आले. तसेच पी. ए. सिस्टिमवारे कारखाना परिसरात वाहनचालकांना सूचना देण्यात आल्या.वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर यानंतर प्रभावीपणे कायदेशिर कारवाई करणेत येणार असल्याचा इशारा देण्यात आला. कोणीही वाहतुक नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.सदर कार्यक्र म प्रसंगी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हाईस चेअरमन उत्तम भालेराव, माजी संचालक संजय पडोळ, सचिव बाळासाहेब उगले, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगावचे पोलिस हवालदार राठोड व पोलिस नाईक योगेश वाघ, पोलिस हवालदार संदिप भालेराव आदी उपस्थित होते.
कादवा कारखान्यावर ऊस वाहतूकदारांचे महामार्ग वाहतूक पोलिसांच्या वतीने प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 5:43 PM
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना येथे महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगावच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत उस वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात आले.
ठळक मुद्देवाहन चालकांवर यानंतर प्रभावीपणे कायदेशिर कारवाई करणेत येणार असल्याचा इशारा