पंचवटी : जुन्या नाशकातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीमवाडी भागात एका सराईत गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पंचवटी भागात एका पोलीस साडू आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका ३४ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास लावून जीवनप्रवास संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पोलीसांनी दिलेली माहिती अशी, पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई संशयित मनोज खैरे यांच्यासह त्यांच्या सासरच्या अन्य काही लोकांच्या छळाला कंटाळून त्यांचा साडू कुणाल विलास गायकवाड (३४, रा. त्र्यंबकनगर, हिरावाडी) यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद मयत कुणाल याचा भाऊ योगश विलास गायकवाड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित पोलीस मनोज खैरे यांच्यासह सोनाली सोनवणे, ज्योती खैरे, वृषाली महाजन, रमेश त्र्यंबक निकम व माणिक महाजन या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यासंबंधी ध्वनी व चित्रफितीचा पुरावा असल्याचे सांगून ‘आमचे पैसे आणि बहिणीचे दागिने परत कर नाही तर पुन्हा तुला जेलमध्ये पाठवू’ अशी धमकी संशयितांनी एका नातेवाइकाच्या विवाहात दिल्याचेही योगेशने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धमक्या व दमदाटी होत असल्याची तक्रारचार महिन्यांपूर्वी कुणाल गायकवाड यांच्या पत्नीने आत्महत्या केली होती. यामुळे सासरच्या मंडळीने दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांना न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला होता. साडू मनोज खैरे आणि अन्य संशयितांनी त्यांच्याशी संपर्क साधत कुणालकडे मोठी आर्थिक मागणी करून तसेच धमक्या व दमदाटी करून आपल्या भावास आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे योगेश याने तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस साडूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 1:30 AM
जुन्या नाशकातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीमवाडी भागात एका सराईत गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पंचवटी भागात एका पोलीस साडू आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका ३४ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास लावून जीवनप्रवास संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ठळक मुद्देदुसरी घटना : सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल