महिला शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:31 PM2017-09-28T23:31:50+5:302017-09-29T00:10:16+5:30

बागलाण तालुक्यातील टेंभे वरचे येथील महिला शेतकरी भारती दादाजी पाथरे (४०) यांनी मुलींच्या विवाहाच्या विंवचनेतून दि. २७ रोजी सकाळी ७ वाजता स्वत:च्या मालकीच्या शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली.

Suicide of women farmers | महिला शेतकºयाची आत्महत्या

महिला शेतकºयाची आत्महत्या

Next

नामपूर : बागलाण तालुक्यातील टेंभे वरचे येथील महिला शेतकरी भारती दादाजी पाथरे (४०) यांनी मुलींच्या विवाहाच्या विंवचनेतून दि. २७ रोजी सकाळी ७ वाजता स्वत:च्या मालकीच्या शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली.
सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान पाथरे यांनी नामपूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी श्रीराम कोळी, पोलीस कर्मचारी आर. के. शेवाळे, एम. आर पवार यांनी तत्काळ प्रत्यक्ष जागेवर जाऊन भारती पाथरे यांचा मृतदेह गावकºयांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढला. नामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. तलाठी मंडळ अधिकारी यांनी पंचनामा केला असून. घटनेचा पुढील तपास जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड त्यांच्या सहकाºयांच्या मदतीने करीत आहेत.

Web Title: Suicide of women farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.