वणी : लाल कांद्याच्या आवकेनंतरही उन्हाळ कांदा भाव खात असुन दोन दिवसापुर्वी घसरलेले दर उन्हाळ कांद्याचे वाढल्याने कांदा दरातील चढ उताराचा अनुभव उत्पादकाना आला. उपबाजारात दोन वाहनामधुन अवघी ४० क्विंटल आवक उन्हाळ कांद्याची झाली. ७४५१ कमाल, ७२५१ किमान तर ७३५१ रु पये प्रति क्विंटल दर या कांद्याचे उत्पादकांना मिळाले. तर १३ वाहनातुन १०० क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी उत्पादकांनी आणला होता. ५१२२ कमाल , ३६५७ किमान तर ४४०६ रूपये सरासरी अशा दराने कांदा व्यापार्यांनी खरेदी केला. लाल कांद्यापेक्षा उन्हाळ कांद्याला वाढीव दर मिळालेले आहेत. दरम्यान, लाल कांद्यालाही बऱ्यापैकी दर मिळत असल्याने आर्थिक उलाढालीची गती वाढली आहे.
उन्हाळ कांदा दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 3:29 PM