शहर व परिसरात मागील आठवड्यात वाढलेल्या थंडीचा कडाका या आठवड्यात पुन्हा कमी झाला आहे. गेल्या आठवड्यापासून नाशिककरांना दुपारनंतर उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यात शहराचे कमाल तापमान ३१.७ अंशापर्यंत स्थिरावत होते. या आठवड्यात तर कमाल तापमान थेट ३३अंशापर्यंत जाऊन पोहचले. यामुळे शहरवासियांना पुन्हा पंख्यांचा वेग वाढवाला लागला तर अनेकांनी वातानुकूलित यंत्रे सुरु करून उकाड्यापासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला. शहरात वाढलेली थंडी आता पुन्हा गायब झाली आहे. कमाल-किमान तापमानात मागील चार दिवसांपासून सातत्याने वाढ होऊ लागल्याने, नाशिककरांना थंडीच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला आहे. पंधरवड्यापुर्वी किमान तापमानाचा पारा थेट ९.१ अंशापर्यंत घसरला होता, तसेच कमाल तापमानही २८ अंशांपर्यंत खाली आले होते. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती.
उन्हाळ्याची चाहूल; उकाड्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:16 AM