जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धेत शब्दांच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:17 AM2019-10-05T00:17:21+5:302019-10-05T00:17:50+5:30
ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर शाळेच्या वतीने स्व. आनंद जोर्वेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा डे केअर सेंटर शाळेत उत्साहात संपन्न झाली.
इंदिरानगर : ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर शाळेच्या वतीने स्व. आनंद जोर्वेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा डे केअर सेंटर शाळेत उत्साहात संपन्न झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी गजलकार प्रदीप निफाडकर, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव संस्थेचे अध्यक्ष अॅड. ल. जि. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, सहसचिव अॅड. अंजली पाटील, संचालक वसंतराव कुलकर्णी, अनिल भंडारी, छाया निखाडे, डॉ. मुग्धा सापटणेकर, प्राचार्य शरद गिते, पूनम सोनवणे, माधुरी मरवट, इंग्रजी माध्यमाच्या विद्या अहिरे उपस्थित होते. कार्यक्रम स्पर्धेनंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. बालकवी स्पर्धा ही पाच गटांत घेण्यात आली. यामध्ये अन्यरचित काव्यवाचन स्पर्धा इयत्ता तिसरी ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व स्वरचित काव्यवाचन स्पर्धा पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी बारावी या गटांत घेण्यात आली.
यावेळी परीक्षक म्हणून कवीं विलास पंचभाई, किरण सोनार, दैवशाला पुरी, सीमा आडकर, यतिन मुजुमदार, अलका कुलकर्णी, आरती डिंगोरे, डॉ. सायली आचार्य, रूपाली बोडके, अश्विनी पांडे, सुवर्णा बच्छाव, अशोक पाटील, सुनील हिंगणे यांना लाभले. स्वरचित काव्यवाचन पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक हिर्शता संदीप बद्दर, द्वितीय ओवी, उमेश कुलकर्णी, तृतीय मल्हार सोमनाथ क्षेमकल्याणी, ग्रामीण विभाग पाचवी ते सातवी प्रथम श्रुती जयराम शिंदे, द्वितीय सार्थक प्रमोद कुंभकर्ण, तृतीय श्रेया आबासाहेब शिरसाट आदी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. सूत्रसंचालन कल्पना चव्हाण, पूजा केदार यांनी केले.