शेतकऱ्यांचा सर्वेक्षणाला  होकार, पण कर्मचारी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:51 PM2018-12-25T23:51:26+5:302018-12-26T00:21:57+5:30

मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत नगर वसविण्यासाठी अखेरीस शेतकरी सर्वेक्षणाला राजी झाले आहेत. तथापि, यासंदर्भात कंपनीकडेच सर्वेक्षणाची सोय नसून त्यामुळे बाहेरून रसद घेण्याची वेळ आली आहे.

 A survey of farmers, but where is the employee? | शेतकऱ्यांचा सर्वेक्षणाला  होकार, पण कर्मचारी कुठे?

शेतकऱ्यांचा सर्वेक्षणाला  होकार, पण कर्मचारी कुठे?

Next

नाशिक : मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत नगर वसविण्यासाठी अखेरीस शेतकरी सर्वेक्षणाला राजी झाले आहेत. तथापि, यासंदर्भात कंपनीकडेच सर्वेक्षणाची सोय नसून त्यामुळे बाहेरून रसद घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिनाभरात सर्वेक्षण पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सर्वेक्षणास मंजुरी म्हणजे प्रकल्पाला मंजुरी नव्हे, असे शेतकºयांचे प्रतिनिधी शरद कोशिरे यांनी सांगितले.  स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद शिवारात ७१५ एकर क्षेत्रात नगररचना योजना राबविण्यात येणार असून, त्यात नियोजनबद्ध नगर वसविण्याचा प्रस्ताव आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार शेतकºयांना अहमदाबाद येथील नगररचना योजना दाखविण्यात आली आणि त्यांनतर नुकतेच महाकवी कालिदास कलामंदिरात नियोजित प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. शेतकºयांच्या जमिनी घेतल्यानंतर मोबदला दिल्यानंतर काय मिळणार? असे प्रश्न शेतकºयांनी केल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी सर्र्वेक्षण केल्यानंतरच हिशेब करूनच लाभाचे गणित मांडण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यावरून शेतकºयांनी आपसात चर्चा करून नंतर निर्णय कळवू, असे सांगितले होते. आता शेतकºयांनी सर्र्वेक्षणास परवानगी दिली आहे.  अशाप्रकारची सर्वेक्षणास परवानगी म्हणजे संपूर्ण प्रकल्प राबविण्यास परवानगी नव्हे, असे देखील स्पष्ट करण्यात आल्याचे शेतकºयांचे प्रतिनिधी शरद कोशिरे यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी कंपनीने सर्वेक्षण केल्यानंतर सातबारा उतारे, भूमी अभिलेखावरील नोंदी आणि प्रत्यक्ष असलेली स्थिती या सर्व विषयांचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर लाभाचे गणित मांडले जाणार आहे.

Web Title:  A survey of farmers, but where is the employee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.