डास निर्मिती ठिकाणांचे सर्व्हेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 06:21 PM2021-07-05T18:21:26+5:302021-07-05T18:22:04+5:30
सायखेडा : गोदाकाठ व परिसरात पावसाळा सुरू होताच डेंग्यु, मलेरिया, ताप व अतिसार आदी आजार डोके वर काढू लागतात. त्यासाठी या आजारास कारणीभूत असणाऱ्या मच्छरांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करण्याची मोहीम सायखेडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडून सुरू करण्यात आली आहे.

सायखेडा येथे नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या डांस उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करण्याची गरज असुन घराजवळील पाण्याचे उघडे हौद, टाकी हे स्वच्छ करून ती झाकण्याची आवश्यकता आहे. तसेच आपल्या घराच्या आसपास स्वच्छता करून रोगराईला दूर करण्याची आवश्यकता असल्याचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडुन आवाहन करण्यात आले असुन डांस उत्पत्तीची ठिकाणे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन सायखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुजाता कातकाडे यांनी केले आहे. गावात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सायखेडा उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जया ताकतोडे, आरोग्यसेविका शितल जमधाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक बापू अहिरे, आशा सेविका सरला मोरे, चंद्रकला सूर्यवंशी, रूपाली सोनवणे, सीमा पोटे, अंजुम शेख, दिपाली जाधव आदी डांस उत्पत्ती ठिकाणांचे सर्व्हेक्षण करत आहेत.