कवी खलील मोमीन यांना सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:36+5:302021-05-20T04:15:36+5:30
प्रख्यात साहित्यिक प्रा. डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. डाॅ. म. सु. पगारे, माया दिलीप धुप्पड, अशोक कोतवाल, शशिकांत हिंगोणेकर , ...
प्रख्यात साहित्यिक प्रा. डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. डाॅ. म. सु. पगारे, माया दिलीप धुप्पड, अशोक कोतवाल, शशिकांत हिंगोणेकर , डाॅ संजीवकुमार सोनवणे, प्रा बी. एन चौधरी, रवींद्र मालुंजकर या निवड समितीने या पुरस्कारासाठी मोमीन यांची निवड केलेली आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा नाशिक येथे होणाऱ्या एक दिवसीय राज्यस्तरीय अठराव्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी कळविले आहे. या पुरस्काराचे स्वरुप दहा हजार रुपये, गौरवपत्र असे आहे. यापूर्वी प्रा.डाॅ. यशवंत पाठक, वि.भा.नेमाडे, प्रा.डाॅ. आनंद यादव, रवींद्र पिंगे, प्रा. डाॅ. रवींद्र ठाकूर, डाॅ. लक्ष्मीनारायण बोल्ली, महाकवी सुधाकर गायधनी, रा रं बोराडे, लक्ष्मण गायकवाड, सौ. रेखा बैजल, प्रा. डाॅ. तारा भवाळकर, डाॅ. संगीता बर्वे, सौ. माया दिलीप धुप्पड, वामन होवाळ, सुबोध जावडेकर, गिरीश जाखोटीया, प्रा. डाॅ. म..सु. पगारे या नामवंत लेखकांना देण्यात आलेला आहे.
फोटो
मालेगावहून खलील मोमीन यांचा फोटो मागवून घ्यावा.