जीवन प्राधिकरण कर्मचारी संघटनेचा संप स्थगित
By admin | Published: March 11, 2017 01:26 AM2017-03-11T01:26:17+5:302017-03-11T01:26:31+5:30
नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने रविवारपासून सुरू केलेला बेमुदत संप गुरुवारी रात्री उशिरा संपुष्टात आला.
नाशिक : जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तिवेतनाचे दायित्व महाराष्ट्र शासनाने स्वीकारावे, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने रविवारपासून राज्यव्यापी सुरू केलेला बेमुदत संप गुरुवारी (दि. ९) रात्री उशिरा संपुष्टात आला. त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कामकाज पूर्ववत सुरू केले.
गुरुवारी संपाच्या पाचव्या दिवशी (दि. ९) संपाबाबत राज्यस्तरावरून तोडगा न निघाल्याने संप सुरूच होता; मात्र गुरुवारी सायंकाळी उशिरा प्रलंबित मागण्यांचा विषय बुधवारी (दि. १५) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला घेण्यात येईल, या आश्वासनानुसार संप स्थगित करण्यात आला.
नाशिक जिल्ह्णात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ओझर, मोहाडी, इगतपुरी, चांदवड, दहीवाळ, माळमाथा, नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेतील काही गावे, चांदवड ४२ गावे आदि पाणीपुरवठा योजना आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यात ६२०० तर नाशिकला १७५ कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून
सुरू असलेल्या नाशिकच्या कार्यालय आवाराबाहेर संपात मुख्य अभियंता सुदर्शन कालिके, कार्यकारी
अभियंता भरत वानखेडे, अभियंता अजय चौधरी, कृष्णा झोपे, राजन पवार, विलास बापसे, बी. व्ही. सोनवणे यांच्यासह कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)