येवला : येथील श्री गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पदवीग्रहण समारंभात ८८ विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण केली.दिक्षांत सोहळयाला प्रमूख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यापरीषदचे सदस्य तसेच कला, सोनाई वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एल. लावारे तर कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. दातीर उपस्थित होते.व्यासपीठावर मंडळाचे जेष्ठ संचालक अमृतसा पाहिलवान, सहसचिव संजय नागडेकर, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी प्रा. कैलासपती जाधव, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. अजय त्रिभुवन, रा. सो. यो. समन्वयक डॉ. अजय विभांडीक, विद्यार्थी प्रतिनिधी उमा कोटमे आदि उपस्थित होते.आजचा विद्यार्थी हा चालकांची भूमिका करतो आहे. विद्यार्थीने पदवीधर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यांच्यावर देश चालविण्याची जबाबदारी येते. त्यांच्या कडून समाजाच्या अपेक्षा उंचावतात. त्यासाठी विद्यार्थ्याने शिस्तप्रिय असणे आवश्यक असल्याचे डॉ. लावारे म्हणाले.प्राचार्य डॉ. आर. बी. दातीर यांनी अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या कामगिरीचा उल्लेख केला. प्रास्ताविक परीक्षा प्रमुख प्रा. कैलासपती जाधव व परीचय प्रा. पी. एन. पाटील यांनी केले. कार्यक्र माचे सुत्रसंचलन व आभार डॉ. अजय विभांडीक यांनी मानले. या समारंभात ८८ विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण केली.
स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात पदवी ग्रहण समारंभ थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 7:46 PM
येवला : येथील श्री गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पदवीग्रहण समारंभात ८८ विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण केली.
ठळक मुद्देया समारंभात ८८ विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण केली.