‘लिम्का बुक’मध्ये जलतरणपटू स्वयंम पाटीलच्या विक्रमाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 09:36 PM2018-01-20T21:36:05+5:302018-01-20T21:37:15+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंम नियमति चार तास जलतरनाचा सराव करतो.
नाशिक : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर सर्व करणारा डाउन सिन्न्द्रम या आजाराने त्रस्त असलेला जलतरण पट्टू स्वयंम विलास पाटील या खेलाडूची लिमका बुक आॅफ रेकॉर्ड २०१८मध्ये नोंद झाली आहे. मुबईतील समुद्रात संकरॉक ते गेटवे हे पाच किलोमीटरच आंतर त्याने एका तासांत पोहून पूर्ण केले आहे.
डाउन सिन्न्द्रमआजाराने त्रस्त असलेला ९ वर्षे इतक्या कमी वयात तसेच कमी वेळेत हे आंतर पूर्ण करणारा स्वयंम पाटील हा भारतात एकमेव खेळाडू असल्याने लिमकाने त्याची दाखल घेतली आहे..भारतात प्रत्यक क्षेत्रातकामगिरी करनार्या व्यक्तीची या पुस्तकात नोंद घेतली जाते. दि. ११ फेब्रुवारी २०१७ रोजी मुबईतील समुद्रात संकरॉक ते गेटवे हे पाच किलोमीटरच आंतर पूर्ण करण्यासाठी त्याने समुद्रात झेप घेतली. यावेळी त्याचेप्रशिक्षक हरी सोनकांबळे यांच्यासह सहकारी दिशांत सुनील भास्कर, सायली मनोज भदाणे,प्रज्ज्वल सोनजे हे जलतरणपट्टू समुद्रात उतरले होते. स्वयंम हा ‘डाऊन सिंड्रोम’चा रु ग्ण असल्यामुळे त्याच्या या सहकाºयांनी त्याला हे अंतर पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. केवळ एका तासात स्वयंमने हे आंतर पार केल्यावर गेटवे आॅफ इंडियाच्या किनाºयावर त्याची वाट बघत असलेल्या त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळले. गेटवे आॅफ इंडियावर हा विक्र म बघण्यासाटी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंम नियमति चार तास जलतरनाचा सराव करतो. हा विक्र म करण्यासाठी नाशकात सराव करतांना निंबाळते सर, राजू वाईकर यांचेही त्याला सहकार्य लाभले. हा विक्र म करीत असतांनाच स्वयंमने कर्नाटक,गुजरात,गोवा,मालवण आदी ठिकाणच्या समुद्रातील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यशस्वी पूर्ण करून नाशिकचे नाव भारताच्या नकाशावर चमकविले आहे, ३० डिसेंबर २०१७ रोजी कर्नाटक राज्यात उडपी फेस्टिवल निमित्त तेथील समुद्रात १ कलोमीटर अंतर त्याने पूर्ण केल्याबद्दल कर्नाटक राज्यात त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. दि. ७ जानेवारी २०१८रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथील समुद्रात त्याने २ कलोमीटर सागरी आंतर यशस्वी पूर्ण केले. गलेय काही वर्षात त्याने १० गोल्ड ,१ सिल्वर, ८ ब्राँझ पदके मिळविले आहेत. याशिवाय तो नृत्य, मॉडेलिंग,सायकलिंग स्पर्धेत सहभाग घेऊन विविध पारितोषिके मिळवितो .
स्वयंम पाटीलच्या या कामगिरीबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रभागाबाई जाजू विद्यामंदिराच्या मुख्याध्यापक संगीता गजभिये, प्रशिक्षक राजेंद्र निंबाळते, हरि सोनकांबळे, डॉ. राजेंद्र खरात, अरिवंद काबरे, विलास पाटील, विद्या पाटील,जलतरणपटू दिशांत भास्कर, सायली भदाणे, प्रज्वल सोनजे आदि उपस्थित होते.