ड्राय रनच्या माध्यमातून यंत्रणेची सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:32 AM2021-01-09T01:32:30+5:302021-01-09T01:32:50+5:30

कोरोनाला प्रतिबंध करणारी लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नाशिक शहरासह पाच ठिकाणी ‘ड्राय रन’ घेण्यात आली. त्यात १२५ जणांवर रंगीत तालीम करण्यात येऊन सज्जता तपासण्यात आली. यावेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली.

System readiness through dry run | ड्राय रनच्या माध्यमातून यंत्रणेची सज्जता

ड्राय रनच्या माध्यमातून यंत्रणेची सज्जता

Next
ठळक मुद्दे१२५ जणांवर रंगीत तालीम : रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता

नाशिक : कोरोनाला प्रतिबंध करणारी लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नाशिक शहरासह पाच ठिकाणी ‘ड्राय रन’ घेण्यात आली. त्यात १२५ जणांवर रंगीत तालीम करण्यात येऊन सज्जता तपासण्यात आली. यावेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली.      केंद्र सरकारने संपूर्ण देशात एकाच वेळी ड्राय रन घेण्याच्या सूचना दिल्याने शुक्रवारी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालय, त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय, सय्यद पिंप्री प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिक महापालिका नवीन बिटको रुग्णालय, मालेगाव शहरातील मदनेनगर रुग्णालय या पाच ठिकाणी सकाळी १० वाजता या तयारीला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक केंद्रात २५ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची यासाठी निवड करण्यात आल्याने अगोदर त्यांची को-विन या ॲपमध्ये संपूर्ण माहिती भरण्यात येऊन लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींना लसीकरणाची माहिती देण्यात आली व त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष व्हॅक्सिनेशन रूममध्ये सुरक्षित अंतर ठेवून लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पुन्हा विश्रांती कक्षात अर्धा तास ठेवण्यात आले. या लसीकरणाचे परिणाम झाल्याचे मानून काही लाभार्थ्यांना तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आले. ही सारी प्रक्रिया तासभर चालली. लसीकरण करणाऱ्या लसटोचकांना संपूर्ण पीपीई कीट देण्यात आले होते. तसेच प्रत्येक व्यक्तीचे तापमान तपासूनच लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात आला. हातमोजे, तोंडावर मास्क व सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत पुरेपूर दक्षता घेण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता ही रंगीत तालीम संपुष्टात आली. त्यात प्रत्येक बाबींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येऊन त्रुटींचा शोध घेण्यात आला. मात्र जिल्ह्यात ही प्रक्रिया यशस्वी पार पडल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली. 
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ रवींद्र चौधरी, डॉ. दावल साळवे, विनोद मेढे, डॉ. कैलास भोये, डॉ. माधव अहिरे, डॉ. परशुराम किरवले,  डॉ. जयश्री नटेश, डॉ. जयश्री पाटील आदी उपस्थित होते. 

Web Title: System readiness through dry run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.