नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानाही न्यायालय वा पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता गंगापूर गावात फिरणारा संशयित मनोज राजू आघाव (वय २२, रा. गोदावरीनगर, दे. ना. पाटील स्कूलसमोर, गंगापूर गाव, नाशिक) यास गंगापूर पोलिसांनी गुरुवारी (दि़ १४) सायंकाळी अटक केली़ परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सराईत गुन्हेगार मनोज आघाव यास गुन्हेगारी कृत्यांमुळे २२ एप्रिल २०१८ पासून दोन वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे़ मात्र, पोलीस अधिकारी वा न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता तो सोमेश्वर धबधब्याजवळ फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आघाव यास अटक केली़ या प्रकरणी पोलीस नाईक भडिंगे यांच्या फिर्यादीवरून आघाव विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अंबडला महिलेचा विनयभंगघरात नातेवाइकांसोबत बसलेल्या महिलेच्या घरात घुसून तिघांनी मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना अंबड परिसरात घडली़ पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि़ १४) सकाळच्या सुमारास ती नातेवाइकांसमवेत घरात बसलेली होती़ यावेळी संशयित सलीम खाटिक, अमन खाटिक व समीर हे संशयित बळजबरीने घरात घुसले़ यानंतर महिलेस अश्लील शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नाशिकरोडला विवाहितेचा छळमूल होत नाही तसेच व्यवसायासाठी माहेरून पाच लाख रुपये आणत नाही म्हणून पती व सासरकडील मंडळी शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याची फिर्याद विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली आहे़ या फिर्यादीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३० नोव्हेंबर २०११ या कालावधीत संशयित प्रीतिश यशवंत उघाडे व शशिकला यशवंत उघाडे हे मूल का होत नाही, व्यवसायासाठीमाहेरून पाच लाख तसेच आॅपरेशनसाठी माहेरून पन्नास हजार रुपये घेऊन ये या कारणासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत होते़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नशेत दुचाकी चालविणाऱ्या विरोधात गुन्हानाशिक : अमली पदार्थाचे सेवन करून भरधाव दुचाकी चालविणाºया संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ व १४ जून रोजी त्र्यंबक पोलीस चौकीजवळील हॉटेलसमोर संशयित राहुल मोरे (४१) हे भरधाव अॅक्टिवा दुचाकी (एमएच ०४ जीई ०१५०) चालवित होते़ भद्रकाली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी संशयित मोरे यास ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले़ या ठिकाणी तपासणी केल्यानंतर संशयित मोरे यांनी अमली पदार्थ सेवन केल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले व त्यांनी तसे प्रमाणपत्रही पोलिसांना दिले. यावरून संशयित गोसावी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़शहरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरणसरकारवाडा व उपनगरमधील परिसरातील प्रत्येकी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे़ शिलापूर परिसरातील अपहृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास त्यांच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी घटना उपनगर परिसरात घडली़ नाशिकरोड परिसरातील अपहृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि़१३) रात्री ११ ते गुरुवारी (दि़१४) सकाळी ६ या कालावधीत त्यांच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने पळवून नेले़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़प्रेस कर्मचा-याच्या मोबाइलची चोरीकरन्सी नोट प्रेसमधील कर्मचाºयाचा मोबाइल व इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ १४) दुपारच्या सुमारास पाथर्डी फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद मधुकर दाणी (५२, रा. श्री संभव सोसायटी, लॅम रोड, नाशिकरोड) हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून जात होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल, नोट प्रेसचे आयकार्ड, पंचिंग कार्ड, आयसीआयसीआय व स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड चोरून नेले. याप्रकरणी दाणी यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपार मनोज आघाव यास गंगापूर गावातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:00 AM