घोटी खुर्दच्या सरपंचपदी ताई बिन्नर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 06:33 PM2021-03-04T18:33:22+5:302021-03-04T18:35:38+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ताई बिन्नर यांची निवड करण्यात आली आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ताई बिन्नर यांची निवड करण्यात आली आहे.
न्यायालयीन खंडपीठाकडे सुनावणीसाठी असलेल्या प्रक्रियेमुळे रिक्त असलेल्या पदासाठी तहसीलदार इगतपुरी यांच्या आदेशानुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी ताई बिन्नर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्या विरोधात कैलास फोकणे यांचा अर्ज आल्याने छाननी नंतर एकही अर्ज बाद झाला नाही किंवा कोणीही माघार घेतली नाही. उमेदवार कैलास फोकणे यांनी गुप्त मतदान घेण्यासाठी लेखी अर्ज केल्यानंतर गुप्त मतदान घेण्यासाठी नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी सर्वच नऊही सदस्य उपस्थित होते.
निर्धारित वेळेनुसार झालेल्या गुप्त मतदानप्रक्रियेत ताई बिन्नर यांना पाच तर कैलास फोकणे यांना चार मते मिळाली सर्वाधिक पाच मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ताई बिन्नर यांना विजयी घोषित केले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. नवनिर्वाचित सरपंच बिन्नर यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र आवारी व ग्रामसेवक एस खेबडे यांनी काम पाहिले.
यावेळी वाडीव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस पाटील कैलास फोकणे यांचेसह मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी हजर होता. ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रोंगटे, निकिता लोहरे, मनीषा निसरड, बाळू जाधव,उद्धव रोंगटे, उमेश लोहरे, जगन जाधव, चंद्रभान जाधव, सोमनाथ निसरड, सुनील बिन्नर, लक्ष्मण लोहरे आदी उपस्थित होते.