मुलींना निर्भय बनविण्यासाठी तालुकास्तरीय शारीरीक तंदुरूस्ती सराव शिबिर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 07:11 PM2019-05-05T19:11:00+5:302019-05-05T19:12:21+5:30
देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणज्यि महाविद्यालयात मुलींना निर्भय बनविण्यासाठी तालुकास्तरीय शारीरीक तंदुरूस्ती सराव शिबिर सुरू झाले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य हितेंद्र अहेर यांनी दिली आहे.

शालेय जीवनापासूनच मुलींनी निर्भय बनावे ह्या उद्देशाने देवळा येथील कर्मवीर रामरावजी अहेर महाविद्यालयाच्या वतीने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थीनींसाठी हया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलींना स्वसंरक्षण करता यावे, संकटाचा मुकाबला करता यावा यासाठी शिबिरात ज्युदो, कराटे, व कुस्ती या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.दि. १५ एप्रिल रोजी प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
सकाळी साडेसात ते साडेनऊ हया वेळेत नियमतिपणे शिबिर सुरू आहे. ३१ मे पर्यंत शिबिर सुरू राहणार आहे. शाळांना नुकत्याच उन्हाळी सुट्या लागल्या असून सुट्टीच्या काळात तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थीनींनी शिबिरात सहभागी होउन लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य हितेंद्र अहेर, क्रि डा शिक्षक प्रा.प्रमोद ठाकरे यांनी केले आहे.