दीड लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:15+5:302021-05-31T04:11:15+5:30

वनपरिक्षेत्रात वनतळे तयार करणे व वृक्षलागवड करण्याबाबत मालेगाव उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव वनपरिक्षेत्रात १ जुलैपासून ...

The target is to plant 1.5 lakh trees | दीड लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

दीड लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

googlenewsNext

वनपरिक्षेत्रात वनतळे तयार करणे व वृक्षलागवड करण्याबाबत मालेगाव उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव वनपरिक्षेत्रात १ जुलैपासून एक लाख ६४ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यातील जळकू, टोकडे, जळगाव, झाडी, चिंचगव्हाण, डोंगराळे या सहा गावांच्या वनपरिक्षेत्राच्या वनहद्दीत वृक्षलागवड करण्यात येणार आहे. वृक्षलागवडीसाठी मालेगावसह चिंचवे व वनपट या ठिकाणच्या रोपवाटिकेत जवळपास तीन लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये चिंच, सीताफळ, आवळा, करंज, अंजन, शिसव आदी वृक्षांची रोपे तयार करण्यात आली आहेत.

कोट.....

मागील वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे शासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार वृक्षलागवड करण्यात आली नव्हती. परंतू यंदाच्या पावसाळी हंगामात शासनाच्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करून सामाजिक संस्था कार्यकर्ते, वन्यप्रेमी, स्थानिक लोकसहभागातून वनपरिक्षेत्रात वृक्षलागवडीचे उद्दिष्ट् पूर्ण करण्यात येईल.

- जगदीश येडलावार, उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी

Web Title: The target is to plant 1.5 lakh trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.