नाशिक : गंजमाळ येथील भीमवाडीत आग लागण्याची घटना घडल्यानंतर अठरा दिवसझाले तरी यात बेघर झालेले कुटुंबिय भालेकर मैदानाच्या जागेतच राहात आहेत.दरम्यान, त्यांची आता मुळ जागी पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येऊलागली आहे.गंजमाळ येथील भीमवाडीत लागलेल्या आगीत ११६ घरे भस्मसात झाली होती.आधीच आग त्यात गॅस सिलींडरचा स्फोट अशा स्थितीत आग आटोक्यात आणणे कठीणहोते. तरीही महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यातआणली आणि जीवीत हानी होऊ दिली नाही. या दुर्घटनेतील बेघर कुटूंबांनातात्पुरत्या स्वरूपात बी. डी. भालेकर मैदानात आणि महापालिकेच्या एकाशाळेच्या जागेत ठेवण्यात आले आहे. या नागरीकांना शासनाने पाच हजाररूपयांची तातडीची मदत दिली आहे. तसेच विविध सामाजिक संस्था मदतीने भोजनआणि अन्य साहित्य दिले जात आहे.दरम्यान या नागरीकांच्या मदतीसाठी नाशिकमधील सामाजिक संघटनांनी समितीस्थापन केली आहे. या समितीने या आपदग्रस्तांचे त्यांच्या मुळ जागेवरपुनवर्सन करावे अशी मागणी या समितीने केली आहे. सध्या कोरोनाचा संसर्गवाढण्याची भीती असल्याने एकाच ठिंकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कुटूंबानाठेवणे योग्य नाही तरी त्यांना त्यांच्या मुळ जागी नेऊन पुनवर्सन करावीअशी मागणी संघटनेच्या वतीन करण्यात आल्याची माहिती किरण मोहिते यांनीकेली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, महापालकेचे सहायक आयुक्त बी. जी.सोनकांबळे व सहायक आयुक्त महेश डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
आग दुर्घटना : भीमवाडीतील 'ते' कुटुंब अठरा दिवसांपासून मैदानातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 3:51 PM
गंजमाळ येथील भीमवाडीत लागलेल्या आगीत ११६ घरे भस्मसात झाली होती. आधीच आग त्यात गॅस सिलींडरचा स्फोट अशा स्थितीत आग आटोक्यात आणणे कठीण होते.
ठळक मुद्देमुळ जागीच पुनर्वसन करण्याची मागणीएकाच ठिंकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कुटूंबाना ठेवणे योग्य नाही