टीचर इनोव्हेशन अवार्ड मधुकर घायदार यांना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 04:38 PM2020-10-07T16:38:34+5:302020-10-07T16:39:13+5:30
नांदूरवैद्य : माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे शिक्षक मधुकर घायदार यांना राष्ट्रीय स्तरावरील टीचर इनोव्हेशन अवार्ड - २०२० जाहीर झाला आहे.
नांदूरवैद्य : माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे शिक्षक मधुकर घायदार यांना राष्ट्रीय स्तरावरील टीचर इनोव्हेशन अवार्ड - २०२० जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र शासन, रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, इंडियन इंस्टीट्युट आॅफमनेजमेंट (आयआयएम) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) सोलापूर यांच्यातर्फेहा पुरस्कार देण्यात येतो. त्यांच्या शालेय जीवनात उद्योजक तयार करणे या नवोपक्र माला हे अवार्ड जाहीर झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर या पुरस्कारासाठी निवड केल्याचे सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ आणि हेमा शिंदे यांनी कळविले आहे.