मनपा प्रवेशद्वारासमोर शिक्षकांचे चक्रीउपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:48 PM2020-01-13T22:48:06+5:302020-01-14T01:16:50+5:30

सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकीत रक्कम त्वरित मिळण्यासाठी मालेगाव मनपा शिक्षण मंडळाचे शिक्षकांसह निवृत्त शिक्षकांनी आजपासून मनपा प्रवेशद्वारावर चक्री उपोषणास सुरू केले आहे.

Teacher nutrition in front of Municipal entrance | मनपा प्रवेशद्वारासमोर शिक्षकांचे चक्रीउपोषण

चक्री उपोषणात सहभागी झालेले निवृत्त शिक्षक अ.का. पाटील, शंकर जाधव, कुरेशी अब्दुल वहाब, पुरुषोत्तम ठाकूर, संतोष खंगरे आदी.

Next
ठळक मुद्देमालेगाव : सहावा वेतन आयोग फरक थकीत रक्कम देण्याची मागणी

संगमेश्वर : सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकीत रक्कम त्वरित मिळण्यासाठी मालेगाव मनपा शिक्षण मंडळाचे शिक्षकांसह निवृत्त शिक्षकांनी आजपासून मनपा प्रवेशद्वारावर चक्री उपोषणास सुरू केले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून मनपा शिक्षण मंडळाच्या सहाव्या वेतन आयोगाचा फरक रक्कम अंदाजे १० कोटी रुपये मनपाकडे थकीत आहे. रक्कम मिळणेकामी शिक्षकांच्या संघटनेने न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल १२ जुलै २०१८ रोजी झाला. त्यानुसार सर्व बिले तपासून रक्कम अदा करण्याचे निश्चित झाले. महापालिका सभागृहात ठरावाद्वारे मंजूर करूनही सदरची रक्कम अद्यापपावेतो अदा झाली नसल्याने नाइलाजाने आजपासून चक्री उपोषणास प्रारंभ झाला आहे. सर्व शिक्षक वयोवृद्ध आहेत. त्यांना उपोेषण करण्याची वेळ आली आहे.
त्याची सर्व जबाबदारी महानगरपालिकेवर असल्याचे कुरेशी अब्दुल वहाब अब्दुल वहीद, पुरुषोत्तम फुलाजी ठाकूर आदी उर्दू व मराठी शिक्षकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. रक्कम अदा होत नाही तोपर्यंत चक्री उपोषण सुरू राहील,असा निर्धार महापालिका प्रवेशद्वारावर बसलेल्या निवृत्त शिक्षकांनी केला आहे.

निवृत्त शिक्षकांची तक्रार
सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकीत रक्कम मिळविण्यासाठी निवृत्त शिक्षकांना उपोषण करण्याची वेळ आली आहे. ही बाब अतिशय निंदनीय आहे. न्यायालयाचा आदेश असतानाही मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची सेवानिवृत्त शिक्षकांची तक्रार आहे.

Web Title: Teacher nutrition in front of Municipal entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप