शिवरेत ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या भेटीला’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 06:33 PM2020-08-11T18:33:41+5:302020-08-11T18:34:31+5:30
सिन्नर : कोरोना महामारीच्या संकटात शाळा बंद असल्याने निफाड तालुक्यातील शिवरे येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षणसंस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात 'शिक्षक विद्यार्थ्यांच्या भेटीला' उपक्रम राबविला जात आहे. विद्यालयातील तज्ज्ञ विषयशिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चौकशी करून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत.
सिन्नर : कोरोना महामारीच्या संकटात शाळा बंद असल्याने निफाड तालुक्यातील शिवरे येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षणसंस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात 'शिक्षक विद्यार्थ्यांच्या भेटीला' उपक्रम राबविला जात आहे. विद्यालयातील तज्ज्ञ विषयशिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चौकशी करून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी अभ्यासासंदर्भात सुसंवाद घडावा यासाठी प्राचार्य ई. के. भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जे विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत, अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गृहपाठ तपासणी केली जात असल्याचे प्राचार्य भाबड यांनी सांगितले. या उपक्रमात प्रा. जी. एन. हाडपे, बी. पी. सानप, जे. एम. धात्रक, एन. एस. थोरात, एस. पी. जाधव, व्ही. आर. पुरी, बी. के.आव्हाड यांनी सहभाग घेतला. गावातील मंदिरात काही विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून मार्गदर्शन करण्यात आले.