१) आतापर्यंत अपेक्षित पाऊस - १८९. ० मि.मी.
प्रत्यक्ष झालेला पाऊस - १२९.६ मि.मी.
आतापर्यंत झालेली पेरणी -९७,०३७.५४ हेक्टर
२) कोणत्या तालुक्यात किती पाऊस/पेरणी
तालुका पाऊस (मि.मी.) पेरणी (हेक्टरमध्ये)
मालेगाव १२९.०० १५,६८४
बागला ९४.० १५,७४४.११
कळवण ६०.८ १४५९.०
नांदगाव १९३.६ १३,६१४.२०
देवळा ९८.३ ५६५१.००
सुरगाणा ७०.० २४६.००
नाशिक ८९.९ ७१३.००
त्र्यंबकेश्वर २५४.२ ४५.००
दिंडोरी ८९.९ ७५.००
इगतपुरी २८७.१ ९८.२३
पेठ १९६.४ ५८९.६०
निफाड १३७.१ ७८८.००
सिन्नर १०७.३ १०१८.९०
येवला १३३.७ ३३५४९.००
चांदवड १२३८.७ ७७८२.५०
चौकट-
मक्याचा पेरा वाढला
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात मक्याला पसंती दिली झाली असून पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ४७ हजार ३९५ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. तर ७०९५ हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. २०३१२.२० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. ७८५६ हेक्टरवर डाळवर्गीय पिकांची पेरणी करण्यात आली आहे.
चौकट-
...तर दुबार पेरणी
पहिल्या एक-दोन पावसावर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या पण त्यानंतर संपूर्ण जून महिना कोरडा गेला. अधूनमधून काही भागात पोऊस झाला पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. अनेक शेतकरी विहिरीतील पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहे. पण असंख्य शेतकऱ्यांना वरच्या पावसाचाच आधार आहे. जर येत्या पाच सहा दिवसांत पाऊस आला नाही तर अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
चौकट-
देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो
कोट-
पहिला पाऊस जोरदार झाला त्यामुळे हुरूप आला. उत्साहाने मशागतीची कामेही पूर्ण केली पण त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने केलेली पेरणी वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अस्मानी संकटाने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. - ज्ञानेश्वर तांबे, शेतकरी
कोट-
१५ -२० हजार रुपये खर्च करून मक्याची पेरणी केली. पेरणी करतानाच खादीच्या गोण्याही टाकल्या पण आता पावसाने दडी मारली आहे. मागील दोन तीन वर्षापासून हीच स्थिती असल्याने निसर्ग एका अर्थाने शेतकऱ्यांची परीक्षाच पहात आहे, असे म्हणावे लागेल. आता जर दुबार पेरणी करावी लागली तर भांडवल कोठून आणू? - बाळू दौंडे, शेतकरी
कोट-
जिल्ह्यात २७ ते २८ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस आला नाही तर पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. ज्यांची रोपे उतरून पडली पण आता त्यांना पाणी नसल्याने त्यांची वाढ खुंटली आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. एका अर्थाने हे शेतकऱ्याचे नुकसानच आहे. - कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक, नाशिक