लोकमत न्यूज नेटवर्कओझर : कोरोनाच्या पुढे जगाने शरणागती पत्करली असून देशभर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हजारो रोजंदारी करणाऱ्या कामगारांवरही उपासमारीची वेळ आली आहे.कोरोनाचीची चाहूल जसजशी लागत गेली तशी कामगार जगतावर टांगती तलवार तीक्ष्ण होत गेली. त्यात बावीस मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर तर संपूर्ण देश २१ दिवसांच्या लॉकडाऊनला सामोरे गेला. त्यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच उद्योग व्यवसाय व त्यात सुरू असलेले कामकाज थिजले. आठवडे बाजारात रेशन पाण्यापासून ते सर्वच बाबी हप्ता टू हप्ता भरणारे मजूर कुटुंब पुरते बेघर झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.ग्रामीण भागाच्या सर्वच स्थानिक प्रशासनाने आठवडे बाजार भरणार नसल्याचे जाहीर केले. एरव्ही ज्या दिवशी आठवडे बाजार असतो त्यादिवशी सकाळी सदर मजूर तो काम करत असलेल्या ठिकाणी मालकाकडे जातो व तेथील त्याच्या हजेरीनुसार त्याला त्या आठवड्याचा पगार दिला जातो.परंतु आता ही साखळी तुटली असल्याने कोरोनामुळे उद्योग व्यवसाय व स्थानिक छोटे मोठे काम करून उदरिनर्वाह करणाºया मजुरांचे मोठे हाल होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून कंत्राटदारच घरात बसलेला असल्याने तो रोजंदारीच्या मजुरांचे पालन पोषण कसा करणार हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.बाहेर गावाहून आलेले मजूर देखील अचानक उदभवलेल्या परिस्थतीशी दोन हात करताना हरले आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील काही सेवाभावी संस्थांनी एकत्र येत दोन वेळचे जेवण गरजूंना दिल्यास त्यांना देखील मोठा आधार मिळेल शिवाय यातून दातृत्वाची भावना देखील निर्माण होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.स्थलांतरित मजूर कामाअभावी पायीच परतले !त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील स्थलांतरित झालेले मजूर कामाअभावी पायीच परतले आहेत. कोरडवाहू खरीप पिकांचा सीझन संपल्यानंतर शेतमजुरी करणाºया मजुरांना उदरनिर्वाहाचे साधन राहात नाही. अशावेळी दरवर्षी सीझन संपला की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातून शेकडो कुटुंबे नाशिक, मुंबई, ठाणे, कल्याण, गुजरात अशा गावांना मोलमजुरीसाठी स्थलांतर करतात. यावर्षी असेच मजूर कामे करण्यासाठी गेले असताना सध्या आलेल्या जागतिक महामारीने शहरच्या शहरे गाव खेडेपाडे लॉकडाउन झाले आहेत. लोकांना कामधंदे बंद करून घरातच बसण्याचा सरकारने आदेश दिला. बसेस, टॅक्सी आदी वाहने बंद केली. साहजिकच असे मजूर उपाशी दूरवरून पायी पायी आपल्या गावाकडे येत आहेत. पिंपळशेत, सुतारपाडा येथील मजूर घोटी येथून पायी येत असताना अंबोली फाट्यादरम्यान दिसले. खूप थकलेले, भागलेले, भुकेमुळे व्याकुळ झालेले व तहानलेले असे हे लोक. कोणी पायाने लंगडत होते. डोक्यावर मोठे मोठे ओझे काही वृद्ध बघून गाडी थांबवली आणि विचारपूस केली असता दोन दिवसांपासून पायी चालून थकले होते. त्यांना आंब्याच्या झाडाखाली सावलीत बसून पाणी बिस्किटांची सोय करून गाडी पाठवून त्यांच्या गावी सोडायची व्यवस्था केली.