त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल परिसरातील चिंच ओहळ, देवडोंगरा, ओझरखेड या गुजरात सीमेवरील परिसरात घनदाट जंगलात खैर साग या लाकडांची तस्करी होत असते. या झाडांची चोरटी व अवैध वाहतुक होत असते. दि.18 रोजी गुप्त खबर मिळाल्या वरुन वन अधिकारी व कर्मचा-यांनी जीवाची बाजी लाउन सिने स्टाईल थरारक पाठलाग करुन चोरटा मालासह टेम्पो पकडले.त्र्यंबकेश्वर तालुक्याचा पश्चिम भाग गुजरात सरहद्दी पर्यंत हा परिसर विविध वृक्षराजींनी बहरलेला आहे. विविध प्रकारचे वृक्ष या परिसरात आढळतात. घनदाट जंगल असल्याने याचा फायदा घेऊन या परिसरातून, खैर, साग, आदी लाकडांची चोरटी अवैध वाहतूक केली जाते.याचा प्रत्यय 18 ऑक्टो. रोजी एक थरारक पाठलाग करुन अधिकारी व वन कर्मचा-यांना आलामिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी (दि.18) रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास चिंच ओहळ वन परिमंडळ विभागातून लाकडाची चोरटी तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वन विभागास मिळाली. नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगा पाडा या ठिकाणी सापळा रचण्यात आला. अधिकारी व वन कर्मचारी हे दबा धरून बसले होते. या सुमारास टाटा 407 वाहन क्र. ॠख 17 ळ 7606 हा टेम्पो रस्त्यावरून येत असतांना वन अधिकारी व कर्मचारी यांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर वाहनाने चकमा देत अति वेगाने पुढे पळविले. वन कर्मचारी व अधिकारी यांनी त्वरीत पाठलाग सुरू केला.सोळा किलोमीटर अंतर पाठलाग केल्यावर त्यांनी वाहन पकडले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे जंगलात पसार झाले. सदर गाडीची तपासणी केली असता त्यात अंदाजे सव्वा लाख किमतीचे खैराचे लाकूड व एक लाख पन्नास हजार रुपयांचा टेम्पो असा एकुण दोन लाख ७५ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास नाशिक उपवन संरक्षक पंकज कुमार गर्ग, वनक्षेत्रपाल हरसुल विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी रघुनाथ कुवर करीत आहे. मोहन पवार, कैलास पवार, वनरक्षक किरण गवळी, राजेंद्र चौधरी, उमेश भोये, वाहन चालक संजय बघरें, वनमजुर पोपट राऊत व इतर कर्मचाऱ्यांनी या कामी जीवाची बाजी लावुन यशसवी झाले.
लाखोच्या मालाच्या लाकडाचा तस्करी करतांना लाकडासह टेम्पो जप्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 4:18 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल परिसरातील चिंच ओहळ, देवडोंगरा, ओझरखेड या गुजरात सीमेवरील परिसरात घनदाट जंगलात खैर साग या लाकडांची तस्करी होत असते. या झाडांची चोरटी व अवैध वाहतुक होत असते. दि.18 रोजी गुप्त खबर मिळाल्या वरुन वन अधिकारी व कर्मचा-यांनी जीवाची बाजी लाउन सिने स्टाईल थरारक पाठलाग करुन चोरटा मालासह टेम्पो पकडले.
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी या कामी जीवाची बाजी लावुन यशसवी झाले.