निविदाप्रक्रियेमुळे दोन्ही उड्डाणपुलांना मिळाली चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 11:42 PM2021-02-08T23:42:24+5:302021-02-09T00:32:47+5:30

नाशिक : शहरातील भवानी चौक आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पुलांना सत्तारूढ भाजपने रोखण्याचा प्रयत्न केल असला तरी प्रशासनाने कार्यवाही सुरूच ठेवली असून, या दोन पुलांसाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एका पुलाच्या बांधकामांसाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत, तर दुसऱ्या पुलासाठी चार निविदा प्राप्त झाल्या आहेत.

The tender process gave impetus to both the flyovers | निविदाप्रक्रियेमुळे दोन्ही उड्डाणपुलांना मिळाली चालना

निविदाप्रक्रियेमुळे दोन्ही उड्डाणपुलांना मिळाली चालना

Next
ठळक मुद्देभवानी चौक आणि त्रिमूर्ती चौक साकारण्यासाठी २४५ कोटी रुपयांचा खर्च येणार

नाशिक : शहरातील भवानी चौक आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पुलांना सत्तारूढ भाजपने रोखण्याचा प्रयत्न केल असला तरी प्रशासनाने कार्यवाही सुरूच ठेवली असून, या दोन पुलांसाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एका पुलाच्या बांधकामांसाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत, तर दुसऱ्या पुलासाठी चार निविदा प्राप्त झाल्या आहेत.

भवानी चौक आणि त्रिमूर्ती चौक साकारण्यासाठी २४५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महापालिकेत कर्ज प्रकरण गाजल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी कर्ज काढण्याच्या सत्तारूढ भाजपच्या प्रस्तावावर फुली मारली. त्यामुळे भाजपने त्या ऐवजी दोन्ही उड्डाण पूल तूर्तास स्थगित करून ते आर्थिक निधीची उपलब्धता झाल्यानंतर सुरू करण्याची मागणी केली. मात्र, त्यास आयुक्त तयार नाहीत. पुलाचे काम सुरू झाले तरी त्यात नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ या आर्थिक वर्षात त्याचे देयक देण्यात येणार असल्याने आयुक्तांनी पुलाचे काम सुरूच ठेवले. या दोन्ही पुलांसाठी ३० जानेवारी ही निविदा सादर करण्याची अंतिम मर्यादा होती. या कालावधीत दोन्ही पुलांसाठी एकूण सहा निविदा प्राप्त झाल्याने आता या पुलांचा मार्ग मोकळा झाला आहे.
निविदांची छाननी करून मार्च महिन्यात त्या अंतिमत: मान्यतेसाठी स्थायी समितीवर सादर केल्या जाणार आहेत, असे शहर अभियंता संजय घुगे यांनी सांगितले. आयुक्तांच्या भूमिकेमुळे महासभेत पुलांच्या ‌स्थगितीचा परस्पर ठराव करूनदेखील कोणत्याही प्रकारचा उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: The tender process gave impetus to both the flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.