बालभारतीकडून पाठ्यपुस्तक विक्री, वितरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:15+5:302021-06-19T04:10:15+5:30
सिडको : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती यांच्यातर्फे पहिली ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके विक्रीसाठी खुली ...
सिडको : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती यांच्यातर्फे पहिली ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके विक्रीसाठी खुली करण्यात आली असून नोंदणीकृत असलेल्या २२२ संस्था व ८२ विक्रेते यांच्यामार्फत ही पुस्तके बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती भांडार अधीक्षक विष्णू पिसे यांनी दिली
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या नाशिक लेखानगर येथील पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र कार्यालयात अधिकृत नोंदणी असलेल्या शाळा व विक्रेते यांना पहिली ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच विभागातील नोंदणीकृत २२२ संस्था व ८२ विक्रेते यांच्यामार्फत ही पुस्तके बाजारामध्येही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे .या भांडारामध्ये नाशिक सह नंदुरबार ,जळगाव ,धुळे आदी भागातील शैक्षणिक संस्था व विक्रेते पुस्तके घेऊन ती बाजारात विक्री करीत आहे. पहिली ते बारावी मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती ,उर्दू ,कन्नड आदीसह विविध भाषांची सर्व पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहे.
इन्फो-
संकेतस्थळावर पीडीएफ पुस्तके मोफत
गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे बालभारती भांडारातील खुल्या बाजारातील विक्रीही कमी झाली होती. यावर्षीही कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग ऑनलाइन स्वरूपात सुरू झाले असून वर्ग ऑनलाईनच सुरू राहणार असल्यामुळे बालभारतीच्या संकेत स्थळावर पीडीएफ स्वरूपात पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्याचेही भांडार अधीक्षक विष्णू पिसे यांनी सांगितले.