दोन हजारांची लाच मागणाऱ्या हवालदारास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 02:00 AM2022-05-06T02:00:41+5:302022-05-06T02:00:56+5:30

कोर्टात केस न पाठविण्यासाठी तसेच पोलीस स्टेशनमध्येच वाद मिटविल्याबद्दल २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदारास रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

The constable who demanded a bribe of Rs 2,000 was caught | दोन हजारांची लाच मागणाऱ्या हवालदारास पकडले

दोन हजारांची लाच मागणाऱ्या हवालदारास पकडले

Next

नाशिक : कोर्टात केस न पाठविण्यासाठी तसेच पोलीस स्टेशनमध्येच वाद मिटविल्याबद्दल २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदारास रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तक्रारदाराचे नातेवाइकाबरोबर भांडण झाल्याने अभोणा पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तक्रारदार आणि नातेवाइकामधील वाद मिटला. मात्र याबाबतची केस कोर्टात न पाठविण्यासाठी हवालदार रमण तुळशीराम गायकवाड याने २ हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली. गुरूवार दि. ५ रोजी हवालदार गायकवाड याने २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून त्याला पकडण्यात आले. हवालदार गायकवाड याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: The constable who demanded a bribe of Rs 2,000 was caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.