दोन शतकांसह मुलींनी गाजवला पहिलाच दिवस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 03:05 AM2022-05-20T03:05:52+5:302022-05-20T03:08:32+5:30
श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी, नवी दिल्ली, विजय नाना स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन संयुक्तरीत्या आयोजित महिला ‘नाशिक प्रीमियर लीग २०२२’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते आणि सुचेता बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे झाले. शुभारंभानंतरच्या ४ पैकी दोन सामन्यात तेजस्विनी बटवाल आणि साक्षी कानडी यांनी नाबाद शतके झळकावत आपापल्या संघांना विजय मिळवून दिला.
नाशिक : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी, नवी दिल्ली, विजय नाना स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन संयुक्तरीत्या आयोजित महिला ‘नाशिक प्रीमियर लीग २०२२’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते आणि सुचेता बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे झाले. शुभारंभानंतरच्या ४ पैकी दोन सामन्यात तेजस्विनी बटवाल आणि साक्षी कानडी यांनी नाबाद शतके झळकावत आपापल्या संघांना विजय मिळवून दिला.
प्रमुख पाहुणे विजय नवल पाटील, सुचेता बच्छाव, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे, खजिनदार हेमंत देशपांडे, ॲड. प्रेरणा देशपांडे यांच्या उपस्थितीत नाणेफेक करून सकाळच्या सत्रातील दोन्ही सामन्यांचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवशीच्या ४ सामन्यांत नाशिक वॉरीअर्स, नाशिक सुपर किंग्स, नाशिक ब्लास्टर्स व नाशिक फायटर्स या संघांनी एक एक विजय नोंदविले. नाशिक सुपर किंग्सच्या तेजस्विनी बाटवाल व नाशिक ब्लास्टर्सच्या साक्षी कानडी या दोन्ही कर्णधारांनी धडाकेबाज नाबाद शतके झळकवत आपल्या संघांना मोठ्या फरकाने विजयी केले.
संक्षिप्त धावफलक व निकाल :
१- नाशिक वॉरिअर्स वि नाशिक चॅम्प्स - नाशिक वॉरिअर्स ३ बाद १३१ – पल्लवी बोडके ५७ वि नाशिक चॅम्प्स ७ बाद ११३ – अनन्या साळुंके ६८ . नाशिक वॉरिअर्स १८ धावांनी विजयी.
२- नाशिक सुपर किंग्स वि नाशिक स्टार्स - नाशिक सुपर किंग्स २ बाद १९४ - तेजस्विनी बाटवाल नाबाद ११२ वि नाशिक स्टार्स सर्वबाद ८२ – कार्तिकी देशमुख ३ बळी . नाशिक सुपर किंग्स ११२ धावांनी विजयी.
३- नाशिक ब्लास्टर्स वि नाशिक स्टार्स - नाशिक ब्लास्टर्स २ बाद १८६ - साक्षी कानडी नाबाद ११९ वि नाशिक स्टार्स ८ बाद ८२ - साक्षी कानडी ४ बळी. नाशिक ब्लास्टर्स १०४ धावांनी विजयी.
४- नाशिक वॉरिअर्स वि नाशिक फायटर्स - नाशिक वॉरिअर्स ६ बाद १०८- तनिष्का चिखलीकर २ बळी वि नाशिक फायटर्स १ बाद १०९ - रसिका शिंदे नाबाद ४५ व आस्था संघवी नाबाद ३४ . नाशिक फायटर्स ९ गडी राखून विजयी.