लोकमत न्यूज नेटवर्कदेवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील प्रसिद्ध इतिहासकालीन राणेखान वाड्यातील कबरीवरील सप्तधातूंचा तिहेरी कळस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. त्यामुळे इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, पोलिसांनी चोरांचा शोध लावण्याची मागणी होत आहे.पानिपतच्या रणसंग्रामात झुंजारसेनानी महादजी शिंदे यांना मदत करणारा निष्ठावान सेवक राणेखान. सेवकाने जीवदान दिल्याने उपकाराची परतफेड म्हणून महादजी शिंदे यांनी राणेखान यांना अमाप संपत्ती व देवपूरसह परिसरातील गावांची जहांगिरी दिली होती. या संपत्तीतून राणेखानने स्वत:च्या देखरेखीखाली कुशल कारागिरांकडून कबर बांधून घेतली. अशा या कबरीवरील सप्तधातूंचा कळस चोरट्याने चोरून नेला. आधीच वाड्याची दुरवस्था झालेली असताना कळस चोरी गेल्याने इतिहासकालीन वैभव नाहीसे होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. चोरांचा शोध लावण्याची मागणी होत आहे.
राणेखान वाड्यातील धातूच्या कळसाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:10 PM
देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील प्रसिद्ध इतिहासकालीन राणेखान वाड्यातील कबरीवरील सप्तधातूंचा तिहेरी कळस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. त्यामुळे इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, पोलिसांनी चोरांचा शोध लावण्याची मागणी होत आहे.
ठळक मुद्देदेवपूर : इतिहासप्रेमींमध्ये नाराजी