वडांगळी येथील सतीमाता मंदिरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 03:13 PM2020-08-02T15:13:44+5:302020-08-02T15:13:44+5:30
वडांगळी : बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा मंदिरात राॠी बाराच्या सुमारास चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. सुमारे पन्नास हजार रु पयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
वडांगळी : बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा मंदिरात राॠी बाराच्या सुमारास चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. सुमारे पन्नास हजार रु पयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
शनिवारी (दि.१) रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास दोन चोरट्यांनी मंदिर परिसरात प्रवेश केला. सुरवातीला सतीमाता मंदिराच्या चांदीच्या पादुका काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्या निघत नसल्याने सामतदादा मंदिराकडे जाऊन मंदिराचे कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर तेथील पादुका कापून तोडण्यात आल्या. व चांदीचे कान काढून पोबारा केला.
हा सर्व प्रकार सी.सी. टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मंदिराचे सुरक्षारक्षक तानाजी चव्हाणके मंदिर प्रांगणात झोपले होते. दोन चोरट्यांपैकी एक चोरी करत होता तर दुसरा चव्हाणके यांच्यावर लक्ष ठेऊन होता. मंदिराच्या दार व खिडक्यांच्या भोवती कापडी पडदा असल्याने सदरील प्रकार लक्षात आला नसावा असा अंदाज आहे. सुमारे चार तास सदर प्रकार सुरू होता.
दोन्ही चोरटे साधारणत: पंचविशीतील वयाचे असावे असा प्राथमिक अंदाज आहे. तोंडाला हात रु माल लावला असल्याने चेहरे ओळखणे मुश्किल आहे. दरम्यान, रविवारी (दि.२) मंदिराचे विश्वस्त अशोक चव्हाण यांनी सिन्नर एम.आय. डी. सी पोलीस ठाण्यात याबाबत तक्र ार दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहे. दरम्यान २०१३ साली अशाच प्रकारे सामतदादा यांच्या पादुका चोरीस गेल्या होत्या. अगदी तोच प्रकार सात वर्षांनी शनिवारी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
(फोटो ०२ सिन्नर, १)
सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सामतदादा मंदिरात चोरट्यांनी चांदीच्या पादुका चोरून नेल्या.