पांझणदेवच्या जि प शाळेला शिकवायला शिक्षक नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:06 PM2020-02-11T23:06:03+5:302020-02-11T23:06:45+5:30
नांदगाव : आधुनिक शिक्षणातून जग जिंकण्याची स्वप्न रेखाटणार्या महाराष्ट्रात शिकवायला शिक्षक नाहीत. मुलांनी तरी करायचे काय हो असा प्रश्न विचारत पालक व विद्यार्थ्यांनी नांदगाव पंचायत समितीच्या दारात उभे राहून आम्हाला मास्तर द्या हो मास्तर अशा घोषणा दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : आधुनिक शिक्षणातून जग जिंकण्याची स्वप्न रेखाटणार्या महाराष्ट्रात शिकवायला शिक्षक नाहीत. मुलांनी तरी करायचे काय हो असा प्रश्न विचारत पालक व विद्यार्थ्यांनी नांदगाव पंचायत समितीच्या दारात उभे राहून आम्हाला मास्तर द्या हो मास्तर अशा घोषणा दिल्या.
पांझणदेवच्या जिल्हा परिषद शाळेला दोन शिक्षक मिळावे ही दीर्घकाळ प्रलंबित मागणी घेऊन विद्यार्थी व पालकांचा मोर्चा थेट पंचायत समतिी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर येऊन धडकला. पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असलेल्या सदर शाळेस सात शिक्षकांची गरज असतांना तिथे फक्त तीन शिक्षक असल्याने विद्यार्थाची शैक्षणिक हेळसांड होत असल्याची तक्र ार आहे.
आमच्या हातात बदलीचे किंवा कायम नियुक्तीचे अधिकार नसल्याचे सांगत प्रशास्नातले अधिकारी विनवणी करीत होते. पण आक्र मक पालक या विनवणीला दाद देत नव्हते अखेर पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी मध्यस्थी करीत प्रशासनाकडुन शिक्षक देण्याचे आश्वासन घेतले. त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला .
तात्पुरत्या शिक्षकाच्या मोबदल्यात प्रशासनाने वेळ मारून नेली असली तरी पालकांची मन:स्थिती योग्य शिक्षक संख्येची आहे. सात अैवजी तीन शिक्षक आहेत त्यातील एक शिक्षक अधुन मधून शालेय कामकाजानिमित्ताने बाहेर असतात. त्यामुळे फक्त दोन शिक्षक आणि १ ते ७ असे वर्ग घेत आहेत.
कायम स्वरु पी शिक्षक देण्याचे अधिकार अम्हाला नाही. पांझन येथे दोन पदे रिक्त आहे. एकाची तात्पुरती व्यवस्था केली आहे. दुसरे शिक्षक बदली काळात देण्याची व्यवस्था करु कायम स्वरु पी शिक्षकाची मागणी वरिष्ठकडे केली आहे.
- एन जी ठोके, प्रभारी गट शिक्षण अधिकारी, नांदगांव.