पाऊस पडण्याची लक्षणे दिसत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 07:03 PM2019-06-11T19:03:11+5:302019-06-11T19:03:42+5:30
खर्डे : जून महिना निम्म्यावर आला तरी देवळा भागात व तालुक्यात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही व सध्या पाऊस पडण्याची कोणतीच लक्षणे दिसत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खर्डे : जून महिना निम्म्यावर आला तरी देवळा भागात व तालुक्यात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही व सध्या पाऊस पडण्याची कोणतीच लक्षणे दिसत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरीप हंगामासाठी येथील शेतकरी सज्ज झाला आहे. नांगरणी, शेणखत टाकणे, बांध घालणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. परंतु पाऊस हुलकावणी देत आहे. यावर्षीचा उन्हाळा तीव्र उन्हाने व गरमीने असह्य झाला होता. त्यामुळे शेतकरयांसह नागरिकही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. इतर भागात रोहिणी नक्षत्रात पाऊस झाल्याने तेथील खरीप हंगामपूर्व मशागती सुरू झाल्या आहेत.
पण येथे पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना काम सुचेनासे झाले आहे. अति उष्णतेमुळे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मृग नक्षत्रातील पाऊस शेतीला फायदेशीर असतो, पण अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने हे नक्षत्र कोरडे जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. येथील बहुतांश शेतकरी खरीप हंगामात मका पिकाला पसंती देतात तर काही पावसाळी कांदा लावतात.
देवळा तालुका खरीप नियोजन पूर्ण, मका क्षेत्रात लक्षणीय वाढीचे संकेत
तालुक्याचे खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झाले असून यंदा ३२ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात खरपाची पेरणी होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून खते व बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
सन २०१८/१९ च्या खरीप हंगामासाठी देवळा तालुका कृषी विभागाने खरीप क्षेत्रात होणाºया संभाव्य वाढी बरोबरच नैसर्गिक अस्थिरतेमुळे होणाºया लेट खरीप पेरणीचेही सूक्ष्म नियोजन केले आहे. नियोजनानुसार २५७५० हेक्टर क्षेत्रात तृणधान्य पेरणी होणार असून त्यासाठी ३५५५ क्वि. बियाणे लागणार आहे. कडधान्यांचा सर्वसाधारण क्षेत्रात ह्या वर्षी घट ग्राह्य धरण्यात आली असून ३२०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १८१० हेक्टर जमिनीवर पेरणी होणार आहे यासाठी विविध कडधान्याचे १६८.७५ क्वि. बियाणे लागणार आहे. गळीत धान्याच्या क्षेत्रात वाढ अपेक्षीत आहे. ९०० हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे मात्र त्यात ५४० हे. ने वाढ होऊन १४४० हे. क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्टे आहे. यासाठी ११६५.९०५ क्वि. बियाणे शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खरीप कांदा ह्या क्षेत्रात ११०० हेक्टरने वाढ होऊन ४५०० हे. क्षेत्रात लागवड होणार असून त्यासाठी बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.
चालू खरीप हंगामात मक्याच्या क्षेत्रात विक्र मी वाढीचे संकेत असून ३२ हजार ९०० हेक्टर क्षेत्रापैकी १६ हजार २५० हेक्टर जमीन ही मका पिकाच्या पेरणीखाली येणार असून त्याचे प्रमाण हे ऐकून खरीप पेरणीच्या पन्नास टक्के इतके आहे. त्यासाठी ३२.५० क्वि. बियाणे उपलब्ध आहे.
- सचिन देवरे,
तालुका कृषी अधिकारी, देवळा.