वाळूचे लिलाव होता महसूलही मिळे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:18 PM2020-10-08T23:18:15+5:302020-10-09T01:17:47+5:30
नाशिक: कारोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत असल्याने आता महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकृतपणे वाळू लिलाव करून महसूल वाढीवर भर देण्याचे आदेश दिले. वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीसही मदतीला घेण्याच्या सुचना गमे यांनी दिल्या.
नाशिक: कारोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत असल्याने आता महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकृतपणे वाळू लिलाव करून महसूल वाढीवर भर देण्याचे आदेश दिले. वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीसही मदतीला घेण्याच्या सुचना गमे यांनी दिल्या.
विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्'ांचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जळगांव येथून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अहमदनगर येथून जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, धुळे येथून जिल्हाधिकारी संजय यादव, नंदुरबार येथून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी, उपायुक्त (सामान्य प्रशासन) रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, सहआयुक्त स्वाती थविल, उपसंचालक भूमिअभिलेख ए. एस. कुलकर्णी, तहसिलदार नरेश बहिरम, तहसिलदार योगेश शिंदे उपस्थित होते.
वाळू लिलावातून महसूल वाढविण्यावर भर देतांना गमे म्हणाले, जिल्हास्तरावर काम करतांना जिल्हाधिकारी यांनी वाळू चोरी कशी रोखता येईल आणि अधिकृतपणे वाळू लिलाव होवून महसूल वाढीवर कसा भर देता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. पर्यावरण समितीकडे गेलेल्या वाळू लिलावाबाबतच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करुन प्रकरणे मार्गी लावावीत. तसेच वाळू लिलावाबाबत सर्वेक्षण करतांना मागील लिलावांचे अवलोकन करून जास्तीत जास्त वाळू लिलाव स्थळांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना गमे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
पावसामुळे पाण्याखाली आलेल्या वाळू्च्या साठ्याचा अंदाज हायड्रोलिक पध्दतीने घेवून प्रत्येक जिल्'ात असणाºया वाळूच्या साठ्याची माहिती तात्काळ सादर करण्याबरोबरच जिल्'ांमधील वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीस विभागाचीही मदत घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आॅनलाईन बिल्डींग प्रणाली’
बांधकाम व्यवसायिकांना शहरात जागेवर उत्खनन करुन परवाना देण्यासाठी आॅनलाईन ‘बिल्डींग प्रणाली’ राबविण्याबाबत महानगरपालिकेशी चर्चा करण्यात यावी तसेच आॅनलाईन बिल्डींग प्रणालीचा उपयोग केल्यास त्याचा चांगला परिणाम उत्पन्न वाढविण्यासाठी होऊ शकतो असेही गमे यांनी सुचविले