केक कापायला आले अन् पथकाला पाहून पळाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:19+5:302021-06-20T04:12:19+5:30
शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता पंचवटी महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने प्रशासनाने नियम शिथिल करून ...
शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता पंचवटी महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने प्रशासनाने नियम शिथिल करून नागरिकांना, तसेच सर्वच दुकानदारांना, हॉटेल चालकांना नियमांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी नांदूर नाक्यावरील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे, सहायक अधीक्षक भूषण देशमुख यांना मिळाली. त्यानंतर मनपा पथक तत्काळ कारवाई करण्यासाठी सदर हॉटेलकडे गेले. त्यावेळी हॉटेल बाहेर १५ ते २० युवक हातात
केक घेऊन उभे होते. मनपा पथक आल्याचे बघून वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या त्या युवकांनी हॉटेलबाहेरून धूम ठोकली.
पथकाला पाहून वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्यांना वाढदिवस साजरा करता आला नाही, तर केकही कापता न आल्याने त्यांचा हिरमोड झाला. मात्र, नियमांचे उल्लंघन केले, म्हणून संबंधित हॉटेल चालकाला पालिकेने पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.