रयत क्रांती संघटनेचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 06:12 PM2020-06-29T18:12:47+5:302020-06-29T18:13:04+5:30
सटाणा : विविध मागण्यांचे निवेदन सादर
सटाणा : कोरोनाचे संकट आणि त्यात शेतकरी विरोधी धोरणामुळे महाराष्टत गेल्या तीन महिन्यात १२०५ शेतकयांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी देखील शासन शेतकरी विरोधी धोरण बदलण्यास तयार नसल्याने संतप्त झालेल्या रयत क्र ांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२९) येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन छेडले. दरम्यान सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांनी त्यांच्या मागण्या शासनस्तरापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आदोलन मागे घेण्यात आले.
रयत क्र ांती संघटनेचे पदाधिकारी दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता विविध मागण्यांसाठी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले .यावेळी महाराष्ट्र शासनाने शेतकरी कर्जमुक्त केलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही बँक कर्ज देत नाही, त्या शेतक-यांना खरीपसाठी पिककर्ज त्वरीत मिळावे . महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची दि . १ एप्रिल २०१५ पासून अंमलबजावणीची घोषणा केली परंतु, आजपावेतो कुठल्याही शेतक-याच्या कर्ज खात्यात रक्कम जमा झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत बरेच शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित आहेत . अशा थकबाकीदार शेतक-यांना कर्जमुक्त होण्यासाठी शासनाने १ जून २००९ पासून कर्जमुक्त करावे. मका हमीभाव केंद्रात बारदान उपलब्ध नसल्यामुळे संथ गतीने खरेदी चालू आहे त्याचा वेग वाढवावा . विद्युत महामंडळाने ग्रामिण भागात अव्वाच्या सव्वा विजिबले दिलेली आहेत ते शासनाने स्वत : च्या तिजोरीतून भरावेत, आदीसह विविध मागण्या मांडण्यात आल्या. आंदोलनात रयत क्र ांती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल पवार, राज्य सरचिटणीस डोंगर पगार, राज्य कार्यकारणी सदस्य दिपक पगार, शेतकरी भिका बापू धोंडगे, रमेश अहिरे, मधुकर पगार, शरद लोटन पगार, नरेंद्र पगार, विशाल धोंडगे, चिंतामण शिरोळे, ज्ञानेश्वर पगार, विरेंद्र पगार आदी सहभागी झाले होते.