सिन्नरच्या उपनगरात चोरट्यांनी चार दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 02:00 PM2019-08-09T14:00:42+5:302019-08-09T14:00:58+5:30
सिन्नर : सरदवाडी रस्त्यावर आजिंक्यतारा हॉटेल व वृंदावननगर भागात चोरट्यांनी चार दुकाने फोडली. सुमारे १९ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
सिन्नर : सरदवाडी रस्त्यावर आजिंक्यतारा हॉटेल व वृंदावननगर भागात चोरट्यांनी चार दुकाने फोडली. सुमारे १९ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. वृंदावनगर भागात चोरट्यांनी राहुल भानुदास लोणारी यांच्या किराणा दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. गल्ल्यातील १५ हजार गिरणी व्यवहाराचे रोख रक्कम व तीन हजार रुपयांची चिल्लर घेऊन चोरटे पसार झाले. ्र्रआजिंक्यतारा हॉटेल परिसरात चोरट्यांनी तीन दुकाने फोडली. मात्र चोरट्यांची हाती फारसे काही लागले नाही. दोन वस्त्रालयाची दुकाने, एक किरणा दुकान व एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी गोण्याच्या गोडावूनेचे शटर वाकवून पाहिले. आत गोडावून असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी इतर दुकानांकडे आपला मोर्चा वळवला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक सोमनाथ पावसे, पंकज मोरे यांनी घटनास्थळी जावून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करीत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी अधिक तपास करीत आहेत.