नाशिक : जिल्ह्यात बाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गुरुवारी (दि. ३) जिल्ह्यात नव्याने १ हजार ३०७ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४० हजार ४५३ इतकी झाली आहे. दिवसभरात ६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा नऊशे झाला आहे. गुरुवारी सर्वाधिक ९५७ रुग्ण शहरात, तर ग्रामीण भागात ३२४ बाधित रुग्ण मिळून आले. दिवसभरात ९९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.आठवडाभरापूर्वी बाधितांचा आकडा घसरला होता; मात्र रु ग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार २१७ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.७९ टक्के रुग्ण बरेजिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार १३६ रुग्ण बरे झाले आहेत, तर ७ हजार ४१७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.४४ टक्के इतके आहे. तसेच बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण २९.६१ टक्के झाले आहे. आतापर्यंत ९४ हजार २८७ रुग्ण निगेटिव्ह आले असून, १ हजार ८९३ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.यापैकी १ हजार ५ रु ग्ण शहरातील आहे. एकूणच शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रु ग्णांची संख्याही वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. एकूणच शहरवासीयांकरिता कोरोना संक्र मणाचा धोका अधिकच वाढला आहे. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे. जिल्'ाची वाढती रु ग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. गुरुवारी सहा रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये शहर व ग्रामीण भागात प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे.नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. सध्याचा काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढला आहे.
जिल्ह्यात आढळले नवीन तेराशे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 1:37 AM
जिल्ह्यात बाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गुरुवारी (दि. ३) जिल्ह्यात नव्याने १ हजार ३०७ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४० हजार ४५३ इतकी झाली आहे. दिवसभरात ६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा नऊशे झाला आहे. गुरुवारी सर्वाधिक ९५७ रुग्ण शहरात, तर ग्रामीण भागात ३२४ बाधित रुग्ण मिळून आले. दिवसभरात ९९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
ठळक मुद्देसंसर्ग : ९९५ रुग्णांची कोरोनावर मात