जिल्ह्यातील तीस गावे ठरली ‘सुंदर गाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:21 AM2021-08-17T04:21:45+5:302021-08-17T04:21:45+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत "आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना" अंतर्गत सन २०१९-२० व सन २०२०-२१ जिल्हा ...
नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत "आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना" अंतर्गत सन २०१९-२० व सन २०२०-२१ जिल्हा व तालुका सुंदर गाव ग्रामपंचायतींचे पारितोषिक वितरण करण्यात आले आहे. एकूण तीस गावांनी हा पुरस्कार पटकाविला असून दोन्ही वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
२०१९-२० मध्ये निफाड तालुक्यातील आहेरगाव, कळवण तालुक्यातील चणकापूर, सिन्नर तालुक्यातील दातली, बागलाण तालुक्यातील टेंभे खालचे, चांदवड तालुक्यातील सोग्रस, इगतपुरी तालुक्यातील धामणगाव, येवला तालुक्यातील पाटोदा, दिंडोरी तालुक्यातील जानोरी, नाशिक तालुक्यातील ओढा, मालेगाव तालुक्यातील येसगाव बुद्रुक, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले, देवळा तालुक्यातील रामेश्वर, सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा, नांदगाव तालुक्यातील नागापूर, पेठ तालुक्यातील तोंडवळ यांना पुरस्कार वितरण करण्यात आले आहे. सन २०२०-२१ मधील निफाड तालुक्यातील ओझर, कळवण तालुक्यातील मेहदर, सिन्नर तालुक्यातील चिंचोली, बागलाण तालुक्यातील नवे निरपूर, चांदवड नन्हावे, इगतपुरी तालुक्यातील नागोसली, येवला तालुक्यातील एरंडगाव खु, दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव, नाशिक तालुक्यातील कोटमगाव, मालेगाव तालुक्यातील बेळगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली, देवळा तालुक्यातील माळवाडी, सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक, नादगाव तालुक्यातील भालूर, पेठ तालुक्यातील बोरवड यांना पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
--इन्फो--
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी
प्रथम क्रमांक : बागलाण, द्वितीय क्रमांक : देवळा, तृतीय क्रमांक : त्र्यंबकेश्वर
सर्वोत्कृष्ट क्लस्टर (आवास योजना): प्रथम क्रमांक : गिरणारे क्लस्टर तालुका नाशिक, द्वितीय क्रमांक : साकोरे क्लस्टर तालुका नांदगाव, तृतीय क्रमांक : क्लस्टर वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत (आवास योजना): प्रथम क्रमांक: दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत देवपाडा, द्वितीय क्रमांक: मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचवे,
तृतीय क्रमांक : बागलाण तालुक्यातील शेवरे ग्रामपंचायत
आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट वित्तसंस्था :
प्रथम क्रमांक : येवला तालुक्यातील जनता नागरी सहकारी बँक, द्वितीय क्रमांक : बागलाण तालुक्यातील बँक ऑफ बडोदा, सटाणा शाखा, तृतीय क्रमांक : आयडीबीआय बँक, सटाणा.
राज्य पुरस्कृत आवास योजना पुरस्कार सर्वोत्कृष्ट तालुके (आवास योजना) प्रथम क्रमांक: सिन्नर, व्दितीय क्रमांक: नांदगाव तालुका, तृतीय क्रमांक: मालेगाव तालुका.
सर्वोत्कृष्ट क्लस्टर (आवास योजना): प्रथम क्रमांक: येवला तालुक्यातील क्लस्टर राजापूर, व्दितीय क्रमांक: इगतपुरी तालुक्यातील क्लस्टर नांदगाव सदो,
तृतीय क्रमांक: त्रंबकेश्वर तालुक्यातील क्लस्टर अंजनेरी,
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत (आवास योजना): प्रथम क्रमांक: बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायत जामोठी, व्दितीय क्रमांक: येवला तालुक्यातील ग्रामपंचायत अंगुळगाव, तृतीय क्रमांक: इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत बोर्ली
आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट वित्तसंस्था: प्रथम क्रमांक: बागलाण तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, सटाणा, व्दितीय क्रमांक: नाशिकमधील गुरुकृपा महिला स्वयंसहायता, नाशिक समूह, साडगाव, तृतीय क्रमांक: येवला तालुक्यातील बँक ऑफ बडोदा, शाखा पाटोदा.
जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, नाशिक:- "स्वामित्व" योजनेंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करून तयार करण्यात आलेल्या मिळकतपत्रिकेचे वाटप शिवाजी तुपे, योगेश तुपे, रामदास डावरे, आनंद तुपे, राजूबाई सयाजी तुपे, सरपंच ग्रामपंचायत कार्यालय बेलू या लाभार्थ्यांना करण्यात आले.