हजारो साईभक्तांची पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:20 PM2018-11-13T13:20:37+5:302018-11-13T13:20:49+5:30
वणी : साईबाबांच्या जन्ममहोत्सवासाठी शिर्डी येथे कार्तिक पौर्णिमेला उपस्थित राहण्यासाठी गुजरात राज्यातील हजारो साईभक्त पदयात्रा करित असुन सापुतारा वणी मार्गे पदयात्रींचे जत्थेच्या जत्थे साईनामाचा जयघोष करित मार्गक्र मण करित आहेत.
वणी : साईबाबांच्या जन्ममहोत्सवासाठी शिर्डी येथे कार्तिक पौर्णिमेला उपस्थित राहण्यासाठी गुजरात राज्यातील हजारो साईभक्त पदयात्रा करित असुन सापुतारा वणी मार्गे पदयात्रींचे जत्थेच्या जत्थे साईनामाचा जयघोष करित मार्गक्र मण करित आहेत. दिवाळी सणाची सांगता झाली की, साईभक्तांना वेध लागतात ते साईबाबांच्या जन्मोत्सवाचे. कार्तिक पौर्णिमेला प्रतिवर्षी व्यापक प्रमाणावर साजरा करण्यात येतो . महाराष्ट्रातील मुंबई भागातुन तर गुजरात राज्यातून ठिकाठिकाणाहुन साईभक्त शेकडो किलोमीटरची पदयात्रा करून शिर्डी येथे भावभक्तीने हजेरी लावतात व त्या ठिकाणी दिपप्रज्वलन करून उत्सव साजरा करतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा असुन गुजरात राज्यातील वाजदा, बिलीमोरा, नवसारी, बारडोली, सुरत, बड़ोदा, धरमपुर भागातील व लगतच्या परिसरातून साईभक्त मार्गक्र मण करित आहेत. साईभक्तांच्या ग्रुपला गुजरातमधे संघ म्हणून संबोधले जाते. भोजन सामुग्री, प्राथमिक आरोग्य सुविधा पिण्याचे पाणी महिला पदयात्री सुरक्षा अपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी दुचाकी चारचाकी वाहने ग्रुपप्रमाणे ओळखपत्र विशिष्ट कपड़े साईबाबांची मूर्ती असलेली पालखी वाद्यवृंद व साईनामाचा जयघोष करीत असते. मार्गक्र मण करणाऱ्या साईभक्तांमधे युवती व महिलावर्गाची संख्या लक्षणीय असते. सापुतारा-वणी रस्त्यावरून अल्यानंतर जगदंबा देवीच्या दर्शनानंतर पिंपळगाव, निफाड, येवला, शिर्डी अशा
मार्गक्र मणाचे नियोजन साईभक्तांचे असते. शेकड़ो किलोमीटर अंतर पायी कापावे लागत असल्याने किमान आठ दिवस अगोदर पदयात्रेचे नियोजन आखण्यात येते. साईभक्त लक्ष्मीपूजनानंतर पदयात्रेला सुरु वात करतात.