सुरतच्या ग्रुपकडून हजारो साईभक्तांना मदत

By admin | Published: November 11, 2016 11:52 PM2016-11-11T23:52:51+5:302016-11-12T00:09:41+5:30

सुरतच्या ग्रुपकडून हजारो साईभक्तांना मदत

Thousands of devotees from Surat group help | सुरतच्या ग्रुपकडून हजारो साईभक्तांना मदत

सुरतच्या ग्रुपकडून हजारो साईभक्तांना मदत

Next

पिंपळगाव बसवंत : येथे गेल्या आठ दिवसांत हजारो साईभक्तांची सेवा करणारा सुरत येथील श्रद्धा सबुरी द्वारकामाई ग्रुपचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.
सुरत डबोली चार रस्ता येथील युवकांचा एसएसडी ग्रुप हा सामाजिक उपक्रम राबविला जाणारा ग्रुप आहे. गेल्या वर्षापासून दिवाळी संपताच गुजरात राज्यातील साईभक्तांना ओढ लागते ती शिर्डी येथे जाण्याची. हजारो गुजराथी भाविक पिंपळगाव बसवंतमार्गे शिर्डीला जात असतात. या भाविकांची सेवा करण्याचे काम हा ग्रुप गेल्यावर्षापासून पिंपळगाव बसवंत येथे करत आहे.
याआधीही त्यांचा उपक्रम सुरूच होता मात्र पिंपळगाव बसवंत येथील ग्रामपंचायत, अंबिकानगर मित्रमंडळ, पोलीस ठाणे आधींच्या सहकार्यने या ग्रुपने पिंपळगाव बसवंत येथे काम सुरू केले असून, गेल्या आठ दिवसात हजारो भक्तांना त्यांनी चोवीस तास सेवा पुरविली आहे. आरोग्य सुविधा, गरम पाणी, नास्ता, जेवण, औषधे आदि सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. शिवाय स्वच्छतेला प्राधान्य देत कुठल्याही प्रकारे काडीकचरा होऊ दिला नाही.
साईभक्ताना सुविधा देताना मात्र या भागात राहणारे सर्व ग्
ाोरगरीब नागरिकांनीही या सुविधांचा लाभ घेतला आहे. ग्रामपंचायत पिंपळगाव यांनी फिरते शौचालय, पाणी, घंटागाडी आदि सुविधा उपलब्ध करून दिले तर अनेक मित्रमंडळाने या ठिकाणी योग्य ती मदत केली.
गुरुवारी आपला मुक्काम स्वच्छता राखून समाप्त केला. रमेश वाझर, मितुल धानावाला, सिद्धार्थ रसानिया, जुगल राठोड, पिंकेश मेवाडा, ढवलभाई पटेल, काली डीजे, सिरीज डीजे, अजयभाई काचारिया, पिंटू वायरमन, विजय मोरे, यशवंत माळी, नारायण आचारी, यशवंत माळी, डॉ. हितेश वाडीवाला, रविभाई घोगारी, सागर वाडीले, भरतभाई, विक्रम राजपूत, कालीपभाई, दीपक राजस्थानी, कमलेश भाई, गिरीश गजल, संतोष भाई आदि ग्रुपचे सदस्य सेवा पुरवित आहेत. (वार्ताहर)

Web Title: Thousands of devotees from Surat group help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.