‘एटीएम’चा नंबर, पिनकोड घेऊन हजारोंची फसवणूक

By admin | Published: April 21, 2017 01:36 AM2017-04-21T01:36:29+5:302017-04-21T01:36:38+5:30

नाशिक : पंतप्रधानांनी नवीन योजना सुरू केल्याचे सांगत एटीएमचा नंबर व पिनकोडची माहिती घेत बँक खात्यातून ३० हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार सिडको परिसरात घडला आहे़

Thousands fraud by taking 'ATM' number, postcode | ‘एटीएम’चा नंबर, पिनकोड घेऊन हजारोंची फसवणूक

‘एटीएम’चा नंबर, पिनकोड घेऊन हजारोंची फसवणूक

Next

 नाशिक : पंतप्रधानांनी नवीन योजना सुरू केल्याचे सांगत एटीएमचा नंबर व पिनकोडची माहिती घेत बँक खात्यातून ३० हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार सिडको परिसरात घडला आहे़
कामटवाडा येथील कमलनगरमधील अभिजित पार्क येथील रहिवासी संजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ७ एप्रिल रोजी सायंकाळी ०९५३४२९०२५४ या क्रमांकावरून फोन आला़ त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन योजना सुरू केली असून त्यासाठी एटीएम व आधारकार्ड नंबर मागितला़ त्यानुसार माहिती घेऊन पाटील यांच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून एकदा २० व त्यानंतर १० असे तीस हजार रुपये काढून घेतले़ या प्रकरणी कामटवाडा येथील संजय पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Thousands fraud by taking 'ATM' number, postcode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.