पाझर तलावात बुडून तीन मुलींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 08:53 PM2020-05-13T20:53:45+5:302020-05-14T00:43:40+5:30
पेठ : तालुक्यातील अंबापूर येथे राहत असलेल्या एकाच कुटूंबातील तीन शाळकरी मुलींचा खंबाळे शिवारातील पाझर तलावात बुडून दुर्देवी अंत झाला. यामध्ये दोन सख्ख्या बिहणींचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पेठ : तालुक्यातील अंबापूर येथे राहत असलेल्या एकाच कुटूंबातील तीन शाळकरी मुलींचा खंबाळे शिवारातील पाझर तलावात बुडून दुर्देवी अंत झाला. यामध्ये दोन सख्ख्या बिहणींचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, निशा पंढरीनाथ किलिबले (९ वर्षे रा. उभीधोंड), योगिता पंढरीनाथ किलिबले (१२ वर्षे, रा उभीधोंड) व पुनम संतोष बोके (१३वर्षे रा अंबापुर) या तिघी बुधवारी ( दि.१३) दुपारच्या सुमारास खंबाळे शिवारातील पाझर तलावात पोहण्यासाठी गेल्या होत्या. आंघोळ करत असतांना खोल पाणी व गाळ याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागल्या. एकमेकींना वाचवण्याच्या नादात तिघींना आपला जीव गमवावा लागला. काठावर असलेल्या एका मुलीने आरडा ओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. याबाबत पेठ पोलीसांनी मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी भेट देऊन तिन्हही मुलींचे मृतदेह बाहेर काढले.
पेठ येथील ग्रामीण रु ग्णालयात उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मृतांपैकी योगिता व निशा या दोन सख्ख्या बिहणी असून निशा ही अंबापूरच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत तर योगीता व पूनम ह्या पेठ येथील जनता विद्यालयात अनुक्र मे सहावी व सातवीत शिक्षण घेत होत्या. याबाबत पेठ पोलीसात अकिस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सद्या लॉक डाऊन आणी शाळांना सुटया असल्याने अंबापूर येथील नामदेव बोके यांच्या उभिधोंड येथील मुलीच्या दोन मुली व मुलाची एक मुलगी अशा तीन नाती एकाच दिवशी मयत झाल्याने बोके कुटूंबीय पूर्णता कोलमडून गेले आहे. कालच मामाच्या गावी आलेल्या दोन्ही संख्या बहिणींचा अंत झाल्याने ऊभिधोंड येथील किलिबले परिवारात दु:खाची छाया पसरली आहे.
-----------------------------
अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहीती मिळताच तहसीलदार संदिप भोसले, पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांनी घटनास्थळी धाव घेत झालेली गर्दी पांगवत
कुंटूंबियांना धीर दिला.एकाच कुंटूबातील तीन मुलींचा असा दारूण अंत झाल्याने बिहण भावासह बोके व किलिबले कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.