सिन्नर : तालुक्यातील मानोरी येथे शेतकºयाच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला करुन तीन शेळ्या व दहा कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत शेतकºयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पांडुरंग बाळाजी सानप यांची गावालगत वस्ती आहे. त्यांनी शेतजमिनीवर पोल्ट्री शेड उभारले आहे. सानप यांनी सोमवारी सायंकाळी त्यांच्या तीन शेळ्या व १५ कोंबड्या पोल्ट्री शेडमध्ये ठेवून वस्तीवर झोपण्यासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी सानप सकाळी पोल्ट्री शेडमध्ये आल्यानंतर त्यांना अज्ञात जंगली प्राणी आत गेल्याचे निदर्शनास आले. त्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडला होता. तर १० कोंबड्याही फस्त गेल्याचे दिसून आले. मृत कोंबड्या व शेळ्या घटनास्थळी दिसून आल्या. सानप यांनी घटनेची माहिती सरपंच रामदास चकणे व दीपक बर्के यांना दिली. त्यानंतर वनविभागास या घटनेची माहिती देण्यात आली. वनपाल प्रीतेश सरोदे, वनरक्षक के. आर. इरकर यांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला. लांडग्याने सदर हल्ला केल्याचा अंदाज आहे. परिसरात पाऊलखूणा शोधण्याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत शेळके यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले. जंगली प्राण्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. या घटनेत शेतकºयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तीन शेळ्या व १० कोंबड्यांचा पाडला फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 6:13 PM
सिन्नर : तालुक्यातील मानोरी येथे शेतकºयाच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला करुन तीन शेळ्या व दहा कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत शेतकºयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पांडुरंग बाळाजी सानप यांची गावालगत वस्ती आहे. त्यांनी शेतजमिनीवर पोल्ट्री शेड उभारले आहे.
ठळक मुद्देवन्यप्राण्याचा हल्ला : मानोरी येथील शेतकऱ्याचे नुकसान