चांदवड : चांदवड तालुक्यातील मालसाणे शिवारात मुंबई-आग्रारोडवर महिंद्र केयूव्ही कार रस्त्याजवळच मोरीवर आदळून कारमधील चार जण गंभीर जखमी झाले. यात चांदवड पंचायत समितीचे उपसभापती मधुकर मुरलीधर जाधव (५५), दिलीप मुरलीधर जाधव (४८) रा. वडाळीभोई तर शिवाजी नारायण आभाळे ( ४२) आभाळेवाडी नाशिक, सूर्यवंशी आदी पाच जणांचा समावेश आहे. माजी उपसभापती मधुकर जाधव हे त्यांच्या नातलगाच्या दशक्रियेसाठी चाळीसगाव येथे जात असताना मालसाणे शिवारात जीप रस्त्यालगतच्या मोरीवर जाऊन आदळली. या अपघातात गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली. गाडीचे डाव्या बाजूचे चाक तुटून पडले. तर छोट्या पुलावरील सरंक्षक भिंत तूटून पडली. चौघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. वडाळीभोई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मालसाणेत अपघात चांदवड : उपसभापती जाधव यांच्यासह तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 1:12 AM