शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन ठार

By admin | Published: September 28, 2016 11:52 PM

शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन ठार

नाशिक : शहरातील महामार्ग बसस्थानक, दिंडारीरोडवरील मेरी कार्यालय व पंचवटीतील स्वामीनारायण मंदिरासमोर झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२७) घडली आहे़ मृतांमध्ये एक वृद्ध महिला, दिंडोरी येथील तरुण व एका अज्ञात इसमाचा समावेश आहे़ मुंबई नाक्यावरील महामार्ग बसस्थानकाजवळील चिंचेच्या झाडाजवळ लावलेली कार (एमएच ०४, एई ५१८९) पार्किंगमधून काढत असताना ती जोरात मागे-पुढे घेतली़ यामुळे कारच्या डाव्या बाजूस बसलेल्या जनाबाई रामजी राठोड (७५, रा़ पंचवटी, नाशिक) या वृद्धेस जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२७) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी कारचालक किशोर बनकर बर्गे (५३, रा़ दोस्ती विहार, बिल्डिंग नंबर २, बी़ विंग /२२७, वर्तकनगर, ठाणे) विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अपघाताची दुसरी घटना दिंडोरी रोडवरील मेरी कार्यालयासमोर घडली़ मेरी वसाहतीकडून मेरी सिग्नलकडे विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या होंडा प्लेझर दुचाकीचालकाने (एमएच १५, ईडब्ल्यू ९६१०) समोरून येणाऱ्या टीव्हीएस व्हिक्टर दुचाकीस (एमएच ३१, बीके १५७३) धडक दिली़ यामध्ये या दुचाकीवरील मुकेश महादेव रामटेककर (३४, रा़ टिटवे, दिंडोरी) यांचा जागीच मृत्यू झाला़ याप्रकरणी प्लेझर गाडीच्या चालकाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अपघाताची तिसरी घटना पंचवटीतील स्वामी नारायण मंदिरासमोर मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली़ मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावकडून द्वारकाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच १८, एसी २५६८) दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला़ या मयत इसमाची ओळख पटलेली नसून पोलीस त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत़ दरम्यान, याप्रकरणी ट्रकचालक राजेंद्र बिरेंद्र तिवारी (४०, रा़ जुने धुळे, जैन मंदिरासमोर, धुळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़