सुचितानगरच्या पाणी प्रश्नाला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:23 AM2021-05-05T04:23:18+5:302021-05-05T04:23:18+5:30

सुचितानगर येथील वीस लाख दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या जलकुंभाचे लोकार्पण झाल्यामुळे सुचितानगर, दीपालीनगर ,विनयनगर, साईनाथनगर , श्री वल्लभ नगर, ...

Tilangali to the water question of Suchitanagar | सुचितानगरच्या पाणी प्रश्नाला तिलांजली

सुचितानगरच्या पाणी प्रश्नाला तिलांजली

Next

सुचितानगर येथील वीस लाख दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या जलकुंभाचे लोकार्पण झाल्यामुळे सुचितानगर, दीपालीनगर ,विनयनगर, साईनाथनगर , श्री वल्लभ नगर, श्रीरामनगर, शिवाजीवाडी, भारतनगर, नंदिनीनगरसह परिसरातील वीस हजार लोकवस्तीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. यापूर्वी राजीवनगर येथील चड्डा पार्क परिसरातील जलकुंभातून सुमारे १४ दशलक्ष लिटर पाणी या भागात देण्यात येत होते. नवीन जलकुंभामुळे आता हे पाणी वाचणार असून, त्याचा उपयोग गजानन महाराज रस्त्यालगतचा परिसर, परबनगर, कमोदनगर, श्री जयनगरसह परिसरातील नागरिकांना चौदा दशलक्ष लिटर पाणी वापरण्यासाठी मिळणार असल्याने उच्च दाबाने पाणी पुरवठा होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

सुचितानगर येथील जलकुंभाचा लोकार्पण सोहळा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, पाणी पुरवठा उपअभियंता रवींद्र धारणकर उपस्थित होते.

(फोटो ०३ जलकुंभ, एक)

Web Title: Tilangali to the water question of Suchitanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.