कोरोनामुळे लोककलांवतांवर उपासारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:30 PM2020-09-26T22:30:16+5:302020-09-27T00:45:52+5:30
सर्वतिर्थ टाकेद : सद्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने लोककलावंतांना उपासमारीने मरणापेक्षा आम्हाला ईच्छा मरणाची परवानगी द्या किंवा शासकिय मदत द्या या आशयाचे निवेदन आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहिर उत्तमराव गायकर वाघेरे यांनी निवासी उप जिल्हाधिकारी डोईफोडे यांचे कड़े निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सर्वतिर्थ टाकेद : सद्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने लोककलावंतांना उपासमारीने मरणापेक्षा आम्हाला ईच्छा मरणाची परवानगी द्या किंवा शासकिय मदत द्या या आशयाचे निवेदन आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहिर उत्तमराव गायकर वाघेरे यांनी निवासी उप जिल्हाधिकारी डोईफोडे यांचे कड़े निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर सद्या यात्रा,उरूस, जयंती, महोत्सव, लग्न वाढदिवस, समारंभ, सोहळे इत्यादि सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत . हे कार्यक्रम सुरू व्हायच्या आतच कोरोनाच्या वैश्विक महामारीने लोककलावंतांच्या संसाराची धुळधाण झाली. कोरोनाने मरण्याऐवजी कलावंताला उपासमारीनेच मरण्याची भिती निर्माण झाली आहे . मुलांचं शिक्षण, लग्नकार्य, आजारपण उपजीविकेसाठी लागणारी साधनसामग्री कुठून आणायची. सरकारकडे अनेक कलावंतांनी साकडं घातलं मात्र त्याकडं दुर्दैवाने दुर्लक्ष झालं .या बत्तर जिण्यापेक्षा मेलेलं बरं ! अशी आवस्ता लोककलावंतांची झाली आहे. याकरिता लोककलावंतांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी असे निवेदनच गायकर यांनी दिले आहे .महाराष्ट्राच्या जडणघडणीत, लोकसंस्कृती जपुन ठेऊन ती जोपासण्याचे मौलिक व समाजप्रबोधानाचे काम लोककलावंतांनी केले आहे. शासनाच्या विविध प्रकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवून "लोकरंजनातून लोकशिक्षण "देण्याचं महनीय कार्य लोककलावंतांनी केलेले असतांना उपेक्षित लोककलावंताला दुसरा मार्गच शिल्लक नसल्याने आपण इच्छा मरणास परवानगी द्यावी .किंवा शासनाने प्रत्त्येक लोककलावंताला नुकसान भरपाई म्हणुन एक लाख रुपये मदत म्हणून द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. (२६ टाकेद)
--------------------
सद्या कोरोणाच्या काळात महाराष्ट्रातील सर्वच लोककलावंतांवर उपासमारीची वेळ सुरू झाली आहे.शासनाने २००८ साली तमाशाला शासकिय अनुदान दिले व नंतर ते बंद केले ते पुन्हा सुरू करावे, म्हाडा प्रकल्पामध्ये पाच टक्के व पंतप्रधान घरकुल योजने मध्ये पांच टक्के आरक्षण द्यावे तसेच आमच्या लोककलावंताना पंधरा हजार रूपये महिना पेन्शन मिळावी या बाबदचे निवेदन दिले आहे. या बाबत बाबासाहेब पाटील यांनी मागण्या मान्य करू पण कुणीही उपोशन करू नका असे दिलेले आश्वासन त्वरीत पुर्ण करावे व आमचे होणारे हाल थांबवावे ही विनंती.
-मंगला बनसोडे करवडीकर, तमाशा फड मालक, सातारा.